श्री रवी हुल्याळकर - ओशोंची ग्रंथसंपदा भेट
अर्थ आणि व्यवस्थापन विषयातील तज्ञ्, शेयर मार्केट सल्लागार, उत्तम दर्दी वाचक, दानशूर, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, समाधानीवृत्ती अश्या गुणांनी श्रीमंत असणारे श्री रवी हुल्याळकर यांनी आमच्या घरी भेट दिली. त्यांच्या घरातील ग्रंथालयातील काही अध्यात्मिक पुस्तके त्यांनी मला भेट दिली. या पुस्तकात ओशो यांची जवळजवळ २५ पुस्तके आमच्या घरी आली. एक ओशो प्रेमींकडून दुसऱ्या ओशो प्रेमीकडे ओशो पुस्तकाची संपदा सुपूर्त करताना त्यांना विशेष आनंद झाला. जबलपूर येथे गेले असताना त्यांनी ओशोंची ग्रंथसंपदा जमा केली. आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांनी भरपूर देणगी दिली आहे. आपली सोसायटीतील अनेक घरकाम कामगार महिलांना अयोध्यावारी, बनारस/गंगा दर्शन घडवून आणले आहे. ही त्यांची दानीवृत्ती आणि मनाचा मोठेपणा खरंच कौतुकास्पद आणि अभिमानस्पद आहे. त्यांच्या कर्तृत्वाबाबत मी काही दिवसापूर्वी ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष भेटून नमस्कार करावा असे मनास वाटले होते. काय योगायोग तेच प्रत्यक्ष आमच्या घरी आले. साधुसंत येति घरा....आम्ही धन्य झालो. मनास आनंद झाला. हा आनंद आपणाशी वाटावा म्हणून हा व्हाट्सअँप...जय श्रीराम .. श्री राम जय राम जय जय राम
Comments
Post a Comment