पुणे आकाशवाणी - चिंतन
07.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे चिंतन श्रवणीय होते. आपण नेहमी सकाळी चिंतन हे ऐकतो तेव्हा आपल्यामधे काय बदल करू शकतो याचे चिंतन करू या. हे आत्मचिंतन वरिष्ठानी जास्त करावे. मुले आपल्यास वेळ देऊ शकत नाही अशी तक्रार न नोकरीतील ताणतणाव, व्यस्त जीवन याचा विचार करून त्यांना समजून घेऊ या. आजची पिढी स्मार्ट आहे त्यांच्या संसारात लुडबुड करायची नाही. बालपणी नातवंडांना आजी-आजोबा यांची गरज असते. ते मोठी झाल्यावर त्यांना मित्र आवडू लागतात.त्यावेळीस आपण स्मार्ट फोन शिकून आपल्या मित्र-मैत्रिणीशी व्हात्साप्प ग्रुपमार्फत संवाद साधू या. उद्याला काय प्राधान्य द्यायचे याचा विचार याला आत्मचिंतन म्हणू या - याने आपणास आत्मबोध होईल.. चांगल्या गोष्टींचे आत्मचिंतन नेहमी करायला हवे. आजचे चिंतन मनास खूप भावले म्हणून आपणाशी शेयर केले. वेळ आणि सवड काढून चला तर दररोज पुणे आकाशवाणी केंद्रावर सकाळी ६.२५ वाजता चिंतन ऐकू या..🙏
08.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे चिंतन श्रवणीय होते. आत्मचिंतनामध्ये आपले चुकते कोठे हे पाहावे. स्वतःशी संवाद साधा. इतरांशी वाद टाळून नेहमी सुसंवाद साधायला हवे. सुसंवादामध्ये सहज सोप्या भाषेत संवाद - जड वाक्ये नकोत. दुसऱ्यास चुका दाखवले तर आवडत नाही. आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळींचा आदर करायला शिकायला पाहिजे. आपली नापसंती हावभाव देहबोलीतून सांगता येणे म्हणजे संवाद. निसर्गाशी इतर घटकाशी मूक संवाद साधा. सध्या स्मार्ट फोनमुळे संवाद हरवला आहे. आपापसात नेहमी संवादांचा तिळगुळाचा गोडवा वाढीस लागो. संवादाबरोबर आपण लेखनही करणे आवश्यक.
09.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे लेखन याबाबतचे चिंतन श्रवणीय होते. लेखनात मुद्देसुद्पणा ,नेमकेपणा साधा फाफटपसारा टाळा. उत्तम लेखनासाठी पुस्तकांचे वाचन हवे. लहानपणी लेखनाची गोडी लागली नसल्यास आतापासून लिहायला लागा. वही आणि पेन यामध्ये विद्यादेवताचा वास असतो. लेखनासाठी उत्तम विचाराचा सहवास हवा. दुसऱ्याच्या विचाराची कॉपी नको. आत्मविश्वास हवा तरच आत्मसन्मान मिळतो. सध्या मोबाईलच्या की बोर्डामुळे अक्षर सारखेच असते. पूर्वी स्वःअक्षरातील पत्रे, चिठ्या जपून ठेवल्या जात असे. दिसामाजी काही तरी लिहावे असे श्री रामदास स्वामींनी सांगितले आहे. जमेल तसे वाचन आणि लेखन करावे. वाचन आणि लेखनाच्या उत्तम सवयी लावून घेऊ या. . लेखनातील ह्रस्व आणि दीर्घ या चुकांकडे न पाहता भावना ओळखा. लेखन कोणासाठी आणि कश्यासाठी हे प्रथम ठरवा. नेमके काय लिहायचे यावर चिंतन करू या. चांगले जे श्रवण केले ते शेयर केले....
10.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे "अभ्यास" याबाबतचे चिंतन श्रवणीय होते. अभ्यास म्हणजे काय आणि का करावा यांचे चिंतन करावे. ज्ञान मिळवण्यासाठी. नेहमी नवनवीन काहीतरी शिकावे. लहान मुलांच्या शंकांना समाधानकारक उत्तरे देऊन त्यांची जिज्ञासा जाणून घ्या, नवीन उपक्रम आणि स्पर्धा यामध्ये भाग घेणे आणि यश मिळाले नाहीतरी अभ्यास महत्वाचा. शिक्षणाबाबत आपल्याला योग्य काय आहे त्याची निवड करावी. गृहिणींना घर चालवणेसाठी - बचत खाद्यपदार्थ, जमा आणि खर्च यांचे अंदाजपत्रक बनवणे, आपले छंद जोपासणे. मुलांचे संगोपन, शिक्षण यांचे नियोजन या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाबाबत आत्मचिंतन करून ज्ञान वाढवू या. 🙏
11.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे " खेळ" याबाबतचे चिंतन श्रवणीय होते. खेळ आणि व्यायाम यामुळे मानसिक थकवा दूर होतो. बैठे खेळामुळे स्थिरता येऊन एकाग्रता वाढते. सागरगोटे खेळामुळे मानेचे व्यायाम होतात. सध्या मोबाइलमधील स्मार्ट अँप खेळामुळे मानेची दुखणी, डोकेदुखी, एकलकोंडेपणा मानसिक आजार वाढले आहेत. मोबाईल ऍडिक्शन हे कारण - रेडी टू इट - खेळामुळे डोके चालवायला नको, बुद्धीला गंज चढतो. सांघिक खेळामुळे संघ भावना आणि देशप्रेम वाढते. खेळात निकोप स्पर्धा हवी. पण खेळातील चुरस गालबोट लावणारी नसावी. पूर्वी बाईला चूल आणि मूल. खेळाची संधी फक्त मंगळागौरी दिवशी मिळत असे. सनातन खेळ खेळून त्या आनंद घेत असत. पण आजकाल मुली आणि स्त्रिया सारे खेळात अग्रेसर आहेत. खेळात आपण कश्याला प्राधान्य द्यावे, आपले खेळात चुकते कोठे -- याचे चिंतन जरूर व्हावे. जीवनात प्रत्येकजण हा खेळाडू आहे. खेळातील हार जीत याचा स्वीकार करू या. जगण्यातील खेळाचा मनमुराद आनंद घेऊ या.😄👍🏻🙏
12.04.2026
आज सकाळी ६.२५ वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे "प्रवास" याबाबतचे चिंतन श्रवणीय होते. आजकाल दूर अंतर कापणारी वेगवान प्रवासी वाहने आहेत. प्रवास सुखकर झाला आहे. पण प्रदूषणाचे प्रश्न वाढले आहेत. अतिक्रमण यामुळे पदपथ असून नसल्यासारखे. रहदारी आणि प्रवास हे हातात हात घालून चालण्याची जोडी. कारणाशिवाय केलेला प्रवास आनंदाचा असतो. नियोजन करून आपल्या देशातील/परदेशातील मंदिरे, पर्वत, निसर्ग, प्रेक्षणीय स्थळे जरूर पाहावीत. प्रवासाचा आनंद लुटताना निसर्गास आणि इतरांस इजा होत नाही याचा विचार हवा. नियम जरूर पाळा. प्रवासातील सुंदर आठवणी घेत जगू या. प्रवासाच्या आठवणी लिहून काढू या. जन्म आणि मृत्यू हा एक प्रवासच. आपला अंतिम प्रवास कोठे आणि कसा याबाबत आपल्याला काहीच माहित नसते. याबाबत चिंतन करणे महत्वाचे. चांगले नियोजन करून आपल्या आयष्यातला जगण्याचा प्रवास सुंदर करू या 🙏🏻
13.04.2026
पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन -स्वामी मकरंदनाथ - भक्तियुक्त साधना - ध्यान करतेवेळी कोणतेही चिंतन, मनन करायचे नाही. काही काळ घरदार, नोकरी, धंदा, शेजारीपाजारी, शत्रू, मित्र याचा विचार नको. अलिप्तपणा हवा. स्वतः सतचितआनंद परमात्मा आहोत असे समजून एकाग्र चित राहून ध्यान करावे. नुसते मंत्र म्हणायचे नाही तर अर्थाकडे लक्ष द्यावे. सद्गुरूंचे पार्थिव दर्शन घ्यावे. तर सात्विक भाव निर्माण होऊन अहंकार नाश होईल. श्वास आत बाहेर घेताना मध्ये थांबायचे या स्थितीला मध्य्म स्थिती अगर एक शून्य स्थिती म्हणतात. दोन कृतिच्यामध्ये शून्य स्थिती. मन निर्विकार - मनरहित स्थिती - स्वरूपाचे ज्ञान होते - मी सतचित आनंद आहे...ध्यानानंतर मी सतचित आनंद आत्मा आहे हे विवेकाने बिंबवणे महत्वाचे. सतत अनुसंधाने प्रभूचे दर्शन घडते.
Comments
Post a Comment