वाचनकट्टा -१3 - " व्यासांचा वारसा " - ले. आनंद विनायक जातेगावकर

 





" व्यासांचा वारसा " - ले. आनंद विनायक जातेगावकर 

हे पुस्तक म्हणजे महाभारतावरील विवेचन.  महाभारतातील अनेक नात्यांतील भावना, कुंती-पांडू, कर्ण, द्रौपदी, कृष्ण, युधिष्ठर, भीष्म, द्रोण, दुर्योधन.. या प्रमुख व्यक्तीरेखा यांचे विवेचन.. व्यास यांचा स्थितप्रज्ञ भाव यांचे सुंदर चित्रण या पुस्तकात लेखकांनी केले आहे. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबतच्या स्वभावाबाबत लेखक म्हणतात - "स्वभाव हेच तुमचे नशीब"  ... मानवी स्वभावाबाबत उत्तम विवेचन लेखकांनी केले आहे.  महाभारतातील इतर नाजूक आणि सुप्त गोष्टी पुस्तक वाचल्यावर समजले. कौरव पांडव यांच्यातील युद्ध - युद्धनीती काही अनीती, नियमभंग, कारस्थान आणि इतर कृत्ये  हे वाचल्यावर मनात संभ्रम निर्माण होतो..हे असेच का, असे का नाही यावर विचार करायला भाग पाडतात  आणि अश्या प्रश्नांना उत्तर  नसतात. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार उत्तरे शोधायची...हे बरोबर हे चूक असे शेवटी काही नसते ...यावर विदुरांचे विचार महत्वाचे.."जग हे असं आहे जसं आहे तसे जाणून समजून घेऊ या"  हे लेखकाचे काव्य आवडले.  या पुस्तकास डॉ. मंगला आठलेकर यांची सुंदर  प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. त्या प्रस्तावनेंत म्हणतात - महाभारतवरच हे अप्रतिम विवेचन प्रत्येकाच्या संग्रही  असायलाच हवं - हे खरेच आहे. माझ्या दर्दी पुस्तकवाचनप्रेमी भावाने मला हे पुस्तक आवर्जून वाचण्यास सांगितले. 




जग हे असं आहे जसं आहे तसंच घे.मरण राग धरत नाही, मरण प्रेम करत नाही मरण इतकं न्यायनिष्ठुर, देवांनाही सोडत नाही. कुरणात धावतो पिसाट वारा, गवताची पाती आडवी करत वस्तीत असंच मरण शिरतं, उभी माणसं आडवी करत.काफिला हा जगणाऱ्यांचा सरकत जातो मरणाकडं कोण आधी, कोण नंतर, त्यानं काय फरक पडतो?हजारो आया, हजारो बाप, हजारो मुलं, बायका हजारो, कोण आई, बाप तरी कुणाचा कोण सगळे येतात, एक दिवस जातात आपण आहोत तरी कुणाचे कोण? हजारो दुःखं हरेक दिवशी इथले भय संपत नाही.सारं काही लयास जातं, काळ साक्षीस उरतो फक्त तारुण्य, सौंदर्य, आयुष्य, आरोग्य, धनदौलत आणि प्रेमसुद्धा; काहीच काही टिकत नाही.ज्याची म्हणून आस धरावी अत्तरासारखं ते उडून जातं विचित्र या वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत रुजत नाहीत.सुजाण आणि मूर्ख, श्रीमंत आणि कंगाल मांस वितळून, आशा सांडून चितेवर सारेच जळून जातात सांगेल का कुणी त्या राखेकडं पाहून ही श्रीमंताची राख, ती गरिबाची राख कुरूपाची आणि देखण्याची राख? कुंभार मडकी बनवत असतो गरगर चाक फिरवत असतो काही मडकी चाकावरच तुटतात चाकावरून काढताना भेगा पडतात सुकताना काही, तर सुकल्यावर काही भट्टीत काही तडकून जातात.भट्टीतून काढताना टिचतात काही वापरून वापरून कित्येक फुटतात.मरण कधी गर्भातच गाठतं कधी जन्मवेळी कधी दिवसानं कधी पंधरवडा, महिनाभरानं वर्षानं कधी, दोन वर्षांनी कधी ऐन तारुण्यात, मध्यम वयात धकल्याभागल्या म्हातारवयात.

जग हे असं आहे जसं आहे घेऊया तसं जाणून समजून घेऊया तसं.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा