कर्नल क्यूब - "मूर्तीमंत वात्सल्य अहिल्यादेवी होळकर"

 





कर्मयोगीनी, तत्त्वज्ञानी, न्यायप्रिय, प्रशासकी सैन्यरचना पारंगत, पुण्यशील, धर्मपरायण, कल्याणकारी, राज्यकर्ती  आणि वात्सल्यमूर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर...असे उद्गार उषाताई कुलकर्णी यांनी कर्नल क्यूब संस्थेने आयोजित केलेले  "मूर्तीमंत वात्सल्य अहिल्यादेवी होळकर"  या कार्यक्रमात व्यक्त केले. अहिल्याबाईंचे जीवन आणि प्रसाशनशैली, साधी  राहणी, धर्मनिष्ठ, न्याय कल्याणकारी आणि संवेदनशील होते.  लग्नानंतर प्रथम  रामायण महाभारत युद्धशास्त्र शिक्षण यांचे धडे त्यांनी घेतले. लग्नानंतर आपल्या फौजीची बांधणी करणे, सरकारी हिशोब ठेवणे  यांची जबाबदारी सांभाळली. आपले पती खंडेराव आणि त्यांच्या स्वतः स्वभावात कमालीचे अंतर होते. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळला. आपले सासरे मल्हारराव यांनी माणूस कसा घडवायचा याचे धडे अहिल्याबाईना दिले. त्या आपली राजधानी इंदोर येथून पवित्र नर्मदा नदीच्या काठीवर असलेल्या  महेश्वर येथे हलवली. राज्य कारभार करताना त्यांनी शेतीसंबंधी अनेक सोयी आणि हिताचे निर्णय घेऊन शेतकरी वर्गात वर्गास दिलासा दिला.  चोर आणि दरोडेखोर यांना सुधारण्याचे संधी देऊन मार्गावर लावले.  विणकाम व्यवसाय सुरू केला. अनेक मंदिरांचा जिर्णोद्वार त्यांनी केला नदीतील घाट बांधून धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र सुरू केले. स्त्रीला दत्तक घेण्याचा अधिकार, महिला सक्षमीकरण, पतीच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर हक्क असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. वीरशाही, करारी, शूरवीर असा त्यांचा लौकिक होता.

आपल्या संसारात पती यांच्याबरोबरचे मतभेद, पतीवियोग, आपले सासरे मल्हार होळकर, आपला मुलगा, नातू मुलगी या सर्वांचे अकाली मृत्यू पाहिले. आपल्या जीवनातील हाल अपेक्षा सोसत,  साधी राहणी, आपल्या प्रजेच्या कल्याण, दूरदृष्टी यामुळे त्यांनी राज्य कारभार उत्तम प्रकारे चालवला. आपले राज्य शंकर भगवान याना समर्पित करून त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्य केले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी हे अहिल्याबाईंच्या दरबारात होते.  "ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम दिले जाईल"  असे मत एका इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी व्यक्त केले होते.. आपल्या तासाभरात उषाताई कुलकर्णी यांनी अहिल्यादेवींच्या कर्तुत्वाबाबत स्वरचित काव्य आणि निवेदन यातून अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र गान श्रोत्यांसमोर सादर केले.  रसिक श्रोते तल्लीन होऊन भाषण ऐकत होते.

85 वर्षीय  आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त उषाताई यांनी 32 वर्षे शिक्षिकेचे काम सांभाळत आजतागायत सतराशे सात कार्यक्रम सादर केले आहेत अशी माहिती सौ साधना डांगी यांनी प्रमुख  वक्त्याची ओळख करून देताना सांगितली.  थोडक्या वेळेत अहिल्याबाई होळकर यांच्याबाबत अधिक माहिती आणि इतर गोष्टी उमगल्या याबाबत  उषाताईंचे मनापासून आभार व्यक्त  केले.  शाळेत असताना 50  मुलामुलींच्या कडून थोर महान व्यक्ती यांच्या बाबतचे अनेक कार्यक्रम उषाताईंनी  करवून सादर केले आहेत याचे साक्षीदार आणि उषाताई यांचा सखोल वाचन, अभ्यास आणि सादरीकरण याबाबत विचार दोघा उपस्थित  हितचिंतकांनी व्यक्त करत उषाताई यांचे  कौतुक केले. या अत्यंत श्रवणीय कार्यक्रमाबाबत  कर्नल्स क्यूब संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद .. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - कोथरूड पुणे -११.०४.२०२६





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा