वाचनकट्टा -१२ - "बकुळगंध" - संपादक राजन लाखे.
"बकुळगंध" - संपादक राजन लाखे.
कवियत्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्ष 2022 यानिमित्त शंभर लेखकांच्या आठवणी आणि त्यांना आवडलेली शांताबाई यांची कविता यांचा संग्रह म्हणजे बकुळगंध. पुस्तकातील १०० लेखक आणि त्यांना आवडलेल्या कविता यांची मी नोंद ठेवली आहे. या पुस्तकातील डॉ. यशवंत पाटणे यांचा लेख मला आवडला. त्या लेखातील काही टिपणी - माणसाचे जिवंतपण कसे ओळखायचे? माणसाचे वय कसे मोजायचे या प्रश्नावर श्री म. माटे यांनी असे उत्तर दिले होते की व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही किती वर्ष त्याची आठवण कृतज्ञतेने काढता हे त्या व्यक्तीचे जिवंतपणा असते. आजही शांताबाई आपल्या डोळ्यासमोर दिसतात. "तुम्ही नेहमी ग्रंथांच्या संगतीमध्ये राहा ग्रंथ तुमचे उत्तम अन्न असते" असे शांताबाई नेहमी म्हणत. "माणसाचे एकाकी पण जर दूर करायचे असेल तर माणसाने मोडायचे नाही माणसाने ग्रंथाचे नाते जोडायचे साहित्याचे नाते जोडायचे आपल्याला ग्रंथ ही भावनिक सोबत देतात." असे शांताबाई म्हणतात. " वेलीवरची एक कळी" या कवितेत देव यावर शांताबाई म्हणतात - "हा देव म्हणजे चांगला विचार, हा देव चांगले साहित्य आणि देव म्हणजे शिक्षक, देव म्हणजे आई वडील ". शांताबाई शेळके यांची बरीच गीते गाजली आहेत. त्यापैकी "ही वाट दूर जाते" आणि " जिवलगा राहिले रे दूर घर माझे" ही गाणी मला खूप आवडतात. हा ग्रंथ वाचनीय आणि संग्रही ठेव्ण्याजोगा आहे.


Comments
Post a Comment