श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती - प.पू. श्री सद्गुरुदास महाराज

 







श्री गुरुपुर्णिमा सत्संग या कार्यक्रमामध्ये दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष धर्मभास्कर प.पू. श्री सद्गुरुदास महाराज (श्री विजयराव देशमुख) यांचे श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती याविषयावर प्रवचन आबासाहेब गरवारे सभागृह येथे शनिवार दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते.


सुरुवातीस श्री रघुनंद पणशीकर यांनी गुरुभक्तीवर गाणे गायले.  गुरुचरित्र कसे लिहिले हे सांगितले. प्रारंभी देवांनी अनुसूया परीक्षाबाबत कथा सांगितली. अनुसूयाचे पतिव्रता अतिशय कडक होते. आपल्या पती/गुरुचे स्मरण करून परीक्षा पार पाडली.  गुरुचरित्र हा मंत्रग्रंथ आहे. गुरुभक्ती मध्ये नारदभक्ती यात ८४ सूत्र सांगितली आहेत. श्री गुरुचरित्रात अध्याय - २,९, १४,२०, ४१ आणि ४८ यातील गुरुभक्ती बाबत कथा सांगितल्या. सुख-दुःख देव अगर गुरु कोणीही देत नाही. आपल्या कर्माचे सुख/दुःख  भोग आपल्यालाच भोगावे लागतात. मात्र आपले गुरु आपले भोग कमी करतात.  गुरुचरित्र हा ट्रान्स मध्ये घेऊन जाणारा ग्रंथ आहे. स्तुती पेक्षा स्तवन महत्वाचे- स्तवनामध्ये भाव असतो. स्तवन करावे, गुरुभजनी रमावे, नम्र राहावे... याने आर्त वाढतो.. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले.. असे माउली म्हणतात - याबाबत अधिक विस्ताराने कथन केले.  


श्री महाराज अखंड दीड तास प्रवचन करीत होते.  श्री महाराजांचे वय ८३ पण प्रवचन करताना पाणीसुद्धा प्राशन केले  नाही. खरच ते एक सिध्दपुरुष आहेत.  त्या थोर सत्पुरुषास माझा मनापासून साष्टांग नमस्कार. सभागृह भक्तांनी तुडुंब भरले होते. प्रवचन श्रवणीय झाले. प्रवचनानंतर आरती आणि दर्शन लाभ आणि महाप्रसाद होता.  एका उत्तम अध्यात्मिक कार्यक्रमास हजर राहता आले मनास समाधान आणि आनंद झाला.  याची अनुभूतीचा प्रसाद आपणास वाटावा म्हणून हा व्हाट्सअँप संदेश...श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..









Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा