मी काय वाचले - 19 "सत्य-कथा "- ले. नीला सत्यनारायण
"सत्य-कथा "- ले. नीला सत्यनारायण
लेखिकेचे पती सत्यनारायण यांची यशस्वी उद्योजक बाबत अनुभव उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत. सत्य यांच्या घराण्यात कोणीही व्यवसाय केला नाही. आपल्या कष्टाने आपला व्यवसाय देशात आणि परदेशी पण वाढवला. आपल्या हाताखाली काम करण्याऱ्या सहकारी मंडळींना प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करून कंपनीत टिकवून ठेवले. त्यांच्या कंपनीचे नाव नावाजले होते, तरी सत्य स्वतः अत्यंत साधेपणाने राहत. ते अतिशय अबोल स्वभावाचे होते असे लेखिकेने लिहिले आहे. कमी बोलण्यावरून पत्नी खूप रागावत असे. पैसा हा सर्वस्व मानले नाही. व्यवसाय सांभाळत आपल्या मतिमंद मुलाचे उत्तम संगोपन करायचे. पुस्तक तरुण मंडळींनी जरूर वाचावे.


Comments
Post a Comment