मी काय वाचले - १७ तिची कहाणीच वेगळी - ले. स्मिता कुलकर्णी
तिची कहाणीच वेगळी - ले. स्मिता कुलकर्णी
लेखिकेची मुलगी - मनाली ही Spina Bifida (spinal cord disease - मणक्याचा एक आजार) या रोगांनी आजारी लहानपणापासून असते. वयाच्या पंधरा वर्षात दहा ते बारा शस्त्रक्रियाना सामोरे जाते. मनाली ही अपंग, गतिमंद आणि कायमस्वरूपी व्हीलचेअरमध्ये बंदिस्त असते. मनालीच्या आई सौ.स्मिता कुलकर्णी या मुलीचे आजारपण, वारंवार हॉस्पिटल, औषधपाणी, संगोपन, घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, मनालीची शाळा हे सांभाळून तिला चित्रकला आणि इतर वेशभूषा, पाठांतर, नाट्याविष्कार या स्पर्धेत भाग घेऊन मनालीने पारितोषिके मिळवली आहेत. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
जन्मापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मनालीच्या प्रवास, स्वतःचा संसार, पतीचे सहकार्य, नोकरी आणि कुटुंबातील माणसांचे आजारपण..जिद्द..सहनशीलपणा.. या सर्वांची कहाणी या पुस्तकात लेखिकेने उत्तम प्रकारे व्यक्त केली आहे. याबाबत लेखिकेचे कौतुक करावे तेवढे कमीच..लेखिकेस आदर्श माता आणि अनेक पुरस्कार लाभले आहेत..
आमच्या सोसायटीतील मैत्रिणीने हे आपल्याकडील पुस्तक आवर्जून वाचावे म्हणून मला दिले. देताना आजारपण याबाबत कल्पना दिली होती तरी हे जरूर वाचावे असे सांगितले होते. आजारपण, रोग यामुळे मी प्रथम थोडे नाक मुरडले होते पण पुस्तक वाचनीय आणि इतरांना प्रेरणादायी नक्कीच आहे. सौ. स्मिता कुलकर्णी यांना आणि कुटुंबियांना मानाचा मुजरा... या पुस्तकास अनेक मान्यवरांचे आशीर्वाद लाभले आहेत. २००८ ते २०२३ पर्यंत पुस्तकाच्या २१ आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. गुजराती आणि अंग्रेजी भाषेत पण या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. यावरूनच या पुस्तकांची लोकप्रियता कळते. पुस्तक सर्वानी जरून वाचावे ही नम्र विनंती...



Comments
Post a Comment