भीमाशंकर

 



२३ जून - आम्ही सकाळी सात वाजता टुरिस्ट गाडीने भीमाशंकर येथे प्रवासास सुरुवात केली. वाटेत नास्ता करत आम्ही भीमाशंकर डोंगरावर पार्किंग नंबर ३ येथे पोचलो प्रचंड गाड्याची गर्दी होती, ट्रॅफिक जाम होते. पार्किंग ३ येथून एसटी बस सोय होती. आम्ही १.३० वाजता मंदिर दर्शन रांगेत उभे होतो. अंदाजे ३ तास लागतील असे वाटले. गर्दीमुळे आम्हास ५.३० वाजले आणि एकदाचे गाभाऱ्यात दर्शनाचा लाभ मिळाला. दर्शनाने सारा शीण नाहीसा होऊन मनास बरे वाटते.  दर्शनावेळी जोरात पाऊसाचा अभिषेक झाला. पण छत बंद असल्यामुळे पाऊसात भिजलो नाही.  दर्शन रांगेत असताना गाडी ड्रायव्हरला फोन करून कल्पना दिली. दर्शन करून आम्ही चहा घेऊन परत ST स्टॅन्ड येथे बससाठी आलो आणि बसने  गर्दीमुळे आम्हास फक्त पार्किंग २ येथेच सोडले. तेथे ड्रायव्हरला फोन करण्यासाठी रेंज नव्हती. देवळात प्रवेशद्वार येथे रेंज होती.. काय देवाची कृपा... पार्किंग येथे आपली गाडी शोध मोहीम सुरु.. शेवटी गाडीजवळ ड्राइवर नव्हता.. तरी जवळपास  होता.  शेवटी चाकण येथील ट्रॅफिक जॅम पाऊस, करत आम्ही घरी रात्री १०.३० वाजता सुखरूप पोचलो.बम बम बोले.. ओम नमः शिवाय 


श्री भीमाशंकर दर्शन रांगेत उभे असताना माझ्या पुढे एक बाबा, मुलगी आणि मुलगा उभे होते.  मुलगी साधारण दहावीमध्ये असावी ती अखंड बाबांशी गप्पा मारीत होती. बाबा माझ्या पुढे उभे असले तरी त्यांचा आवाज नव्हता.  तरीपण ती त्यांना काहीतरी सांगत, गप्पा मारीत होती. बाबांचा काही प्रतिसाद नसला तरी ती अजिबात चिडली अगर रुसली/रागावली नाही...नाहीतर मी इतकी बोलते तुम्ही काहीच बोलत नाही...मुलगा मात्र गर्दीत उभे राहून कंटाळा होता हे खा ते खा असे करीत होते. जास्त बाबांबरोबर बोलणे नव्हते. एकूण मुलगी आणि बाबा यांचे नेहमीच पटते.. मुली आपल्या बाबांच्यावर जास्त प्रेम माया आणि जास्त समजूतदार असतात नाही का .... हे पाहून बरे वाटले. .. हे पाहून मनास सुचले म्हणून हा मेसेज...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा