माझे वाचन - 1
"वेगळी माती, वेगळा वास" - अरुणा ढेरे
लेखिकेचे प्रवासवर्णन वर पुस्तक. वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती आणि मंदिराचे वैशिष्ट्य लेखात नमूद केले आहे. प्रवासातील ठिकाणे -
(१) कुंभकोणम मद्रास - कोमलवल्ली (२) बदामाची लेणी आणि बनशंकरी मंदिर (३) पाषाणाचे गाव - लेपाक्षी (४) बनवासींचा मधुकेश्वर - अलमप्रभू (५) श्रीशैल्यम - श्रीमंत शिवभूमी (६) हळेबीड आणि बेलूर (७) रामानुजनचे गाव (८) नागकॉईल - नागमंदिर (९) गुलबर्गा जवळ उत्तराधिमठ (१०) उडुपी - कणकनखिंडी (११) विजापूर - गोलघुमट (१२) कालिंजर (उत्तर प्रदेश) (१३) खजुराहो (१४) चित्रकूट (१५) आग्र्याचा किल्ला - ताजमहाल (१६) फतेहपुर सिक्रि (१७) नैनिताल (१८) आल्मोर (१९) कसौनी (२०) काठमांडू - पशुपतीनाथ - कुमारीदेवी मंदिर (२१) वाई - कावलानंद सरस्वती मठ, नाना फडणवीस वाडा, (२२) सज्जनगड (२३) तेरवाड - मुक्तेश्वराची समाधी (२४) मालगुंड (२५) गौहती येथील कामाख्या देवी मंदिर
लेखिकेचे कुलदैवत - बनशंकरी - बदामी देऊळ, लेणी आणि मूर्ती यांचे सुंदर वर्णन केले आहे. श्री शाकंभरी देवी ही आमची पण कुलस्वामिनी .. म्हणून मला जास्त भावले. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ पाहताना आलेले अनुभव आणि विचार लेखिकेने उत्तम शब्दात व्यक्त केले आहेत. पुस्तक अत्यंत वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.
२०२४ मध्ये माझ्या पुस्तक वाचनाचा श्रीगणेश उत्तम झाला.




Comments
Post a Comment