कर्नल्स क्यूब - स्वर-श्रुती प्रस्तुत सुगम संगीताचा कार्यक्रम
१३ जानेवारी २०२३ - कर्नल्स क्यूब संस्थेने स्वर-श्रुती प्रस्तुत सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका श्रुती पेंढारकर या संगीत विशारद - २५ वर्षे हॉंगकॉंग येथे संगीत क्लास शिकवत. कार्यक्रमाची सुरवात गगन सदन तेजोमय या प्रार्थनेने झाली. मी राधिका मी प्रेमी, शारद सुंदर चंदेरी.. हे शांताबाईंचे गाणे गायले. गझल मध्ये सुरेश भट यांची केव्हातरी पहाटे.. मत्स्यगंधा नाटकातील - रान साजणी तू तरी चाफेकळी हे नाट्यगीत, ना.ध .महानोर यांचे राजास जवळी बसा.. ही लावणी, कौसल्याचा राम.. कबीराचे विणतो शेले.. ठायी ठायी विठ्ठल आम्ही विठ्ठलाचे वारकरी हे प्रवीण दवणे यांचे गीत. आगामी २२ जानेवारी अयोध्या येथील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम या निमित्याने - विजयी पताका श्रीरामाची हे गाणे गायले. कार्यक्रमाची सांगता "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या गाण्याने झाली.
निवेदन ज्योती गोडबोले, तबला सिद्धार्थ कुंभोजकर, संवादिनी वर प्रांजली पाध्ये, तालवाद्य - अशोक दादा या साथीदारांनी उत्तम साथ संगत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. रसिकांनी या श्रवणीय कार्यक्रमास उत्तम दाद दिली. कर्नल फुले यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment