नवरात्री -श्री शाकंभरी देवी
श्री शाकंभरी देवीस,
साष्टांग नमस्कार
नवरात्री उत्सवानिमित्य आणि श्रेयसच्या नमस्कार पोचवावा म्हणून मी शाकंभरी धाम येथे भेटीस आलो होतो. उत्सवानिमित्य सजावट आणि तुझे दर्शन झाल्यावर मनास बरे वाटून आनंद झाला. बरोबर एक महिन्यापूर्वी श्रेयस जपानला प्रयाण करताना त्याला पुणे विमानतळावर सोडून आम्ही तुला भेटायला आलो होतो. परदेशात, नव्या जागेत, नव्या जगात श्रेयसकडे तुझे लक्ष्य आणि कृपा राहो तूच सांभाळ करणेबाबत प्रार्थना केली होती. श्रेयसच्या टोकियो विमानप्रवास, राहण्याचे ठिकाण, नवे ऑफिस, खान पान सर्व व्यवस्थित आहे. कोठेही त्रास अगर अडचण नाही. ही सारी तुझीच कृपा आणि याचे सारे श्रेय तुलाच आहे. ही भावना मनी बाळगून मी डोळे मिटून तुला कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. हे मी अनुभवले. तुझे तेज पाहून मी कृतकृत्य झालो.
PMT बस पास सेवा , वेळेवर बस मिळणे, बसमध्ये बसायला जागा, कोठेच ट्रॅफिक नाही, सुखकर प्रवास, बसमध्ये छान पुस्तक वाचन, तुझे दर्शन घेतल्यावर लगेच मसाला दूध, तुझे तेजस्वी दर्शनलाभ.. मनस्वी आनंद.. घरी येताना बस स्टॉपवर पालेभाजी गाडीवर दिसली आणि मला नेहमीप्रमाणे मोह आवरला नाही. भाजी खरेदी झाली हा एक प्रकारे देवीचा प्रसादच नाही का ...? मला वाटते तू आपल्या भक्तांची काळजी घेतेस नाही का .. असो नवरात्रीनिमित्त आपल्या नातलग आणि साऱ्या भक्तांची सदैव्य काळजी घे आणि तुझे प्रेम सर्वांवर राहू दे हीच मनापासून प्रार्थना ...या माया मधू... श्री शाकंभरी प्रसीद: मनापासून साष्टांग नमस्कार..
शेखर - 20.01.2024





Comments
Post a Comment