माझे वाचन - 3 - "स्मृतीगंगा" - भा.द.खेर

 






"स्मृतीगंगा" - भा.द.खेर  


लेखकांच्या आठवणीवर आधारित व्यक्तिचित्रात्मक पुस्तक. पुस्तकात धर्मवीर भोपटकर, जयंतराव टिळक, पु. ल. देशपांडे, सुनील गावस्कर मुलाखत, यांच्याबाबत लेख छान आहेत.  "केसरी" वर्तमानपत्रात कामकाजातबाबत आठवणी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनुभवाचे चित्रण उत्तम शब्दात व्यक्त केले आहे. स्वामी स्वरूपानंद यांची पावस येथील भेटीबाबत सुंदर अनुभव लिहिले आहेत. 


आपली साहित्याची आवड जोपासण्यासाठी कर्जत येथील घर सोडून नोकरीनिमित्य पुण्यास आले होते. आपल्या जिद्दीने त्यांनी "केसरी" वर्तमानपत्रात "संपादक" हे पद मिळवून उत्तम काम केले.


आपल्या ९५ वर्ष आयुष्यात भा. द. खेर यांनी शंभर पुस्तके प्रकाशित केली. काही पुस्तकांना पारितोषिक मिळाली आहेत.  मी त्यांचे "हसरे दुःख" - चार्ली चॅप्लिन याच्या आत्मचरित्राचा अनुवाद - माझ्याकडे संग्रही असलेले हे पुस्तक आधी वाचले होते.  स्मृतिगंगा हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.











Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा