'भेदिलें सूर्यमंडळा" -माहितीपट

 






'भेदिलें सूर्यमंडळा" - हा माहितीपट यूट्यूब वर पाहिला.  डॉ अरुण आणि आरती दातार यांच्या जीवनावर आधारित हा माहितीपट आहे. आपले बालपण,घरातील संस्कार, शालेय जीवन, लग्न, लग्नानंतर नोकरी करत असताना झालेला अपघात आणि त्यानंतरचे कष्टमय खडतर जीवन प्रवास..  आपल्यावर आलेल्या शारीरिक, आर्थिक अडीअडचणींवर ज़िद्दीने मात करत उत्तुंग यश संपादन केले याबाबत उत्तम प्रकाश या माहितीपटात चित्रित केला आहे. पती पत्नीचे सहजीवन, पत्नीची त्यागी आणि अध्यात्मिक वृत्ती याबाबत दातार पतिपत्नी म्हणजे आदर्श.. डॉ. आरती दातार यांनी "शून्यातून सूर्याकडे" या पुस्तकात आपल्या सहजीवनातील घडामोडी याबाबत उत्कृष्ट लेखन केले आहेच.  मी हे पुस्तक वाचले आहे.


प्रत्येक यशस्वी पुरुषामागे... या उक्तीनुसार डॉ. अरुण दातार यांच्या पाठीशी डॉ. सौ.आरती ताई खंबीरपणे उभ्या आहेत.  डॉ. सौ. आरती ताई यांचे कर्तृत्व आणि कामगिरी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.  हा माहितीपटातील दुःखाचे आणि सुखाचे प्रसंग मनास भावून जातात आणि आपण अश्रू आवरू शकत नाही.  प्रत्येक पती पत्नी यांनी हा माहितीपट जरूर पाहावा..  डॉ. अरुण दातार सरानी "सूर्यनमस्कार आणि व्यायाम" आणि डॉ.सौ. आरती ताई यांनी "सहजीवन आणि नामस्मरण-आध्यत्मिक जीवन" याबाबत मार्गदर्शन - कळकळीचे आवाहन केले आहे.  आज १ जानेवारी -  आपल्या जीवनात "व्यायाम" आणि अध्यात्म - नामस्मरण -  यांचा संकल्प करून आपले जीवन निरोगी,आनंदी बनवू या.... "सूर्या"सारख्या असण्याऱ्या या दातार दाम्पत्यास मनापासून कृतज्ञापूरक साष्टांग नमस्कार...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा