सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा
२६ जानेवारी २०२४ - सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा - प्रथम स्वातंत्र देवीचे पूजन करून - यंद्याच्या प्रजासत्ताक दिनाचे थीम नारीशक्ती असल्यामुळे ८ वी ते १० वी मुलींच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर शमिका जोशी आणि अमृता जोग यांनी आपले अनुभव सांगितले. शमिका जोशी हिला आजतागायत जिमनॅस्टिकमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ४८ पारितोषके मिळाली आहेत. राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून फेब्रुवारी महिन्यात स्पर्धा आहे. शामिकाने आपली दिनचर्या आणि सराव आणि स्पर्धा याबाबत माहिती दिली. अमृता जोग हिची इंटरनॅशनल स्टुडन्ट exchange कार्यक्रमात रोटरी तर्फे ब्राझील या देशात निवड झाली होती. तिथे १० महिन्याचे प्रशिक्षण होते. आपली निवड, प्रशिक्षण आणि ब्राझील देशात वास्तव आणि संस्कृती याबाबत सर्वाना माहिती सांगितली.
श्री आपटे (बी - विंग) यांनी पुस्तक लायब्ररी बाबत ज्येष्ठ मंडळी यांच्याकरिता घरी वाचनालय याबाबत माहिती दिली. डॉ. जोशी (C - विंग) यांनी आपल्या संशोधन आणि आपल्या पुस्तक लेखन प्रकल्पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता चहा आणि अल्पोपहार यांनी झाली. फुग्याची, रांगोळी आणि इतर फुलाची सजावट आणि सर्व सभासद मंडळींचा आनंदी सहभाग यामुळे प्रजासत्ताक दिन जोरात साजरा झाला. श्री अमरेंद्र कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. भारत माता की जय .. वंदे मातरम... E - ३०२


Comments
Post a Comment