माझे वाचन - २

 






"अर्ध्या वाटेवर " - अरुणा ढेरे 


प्रवासातील ठिकाणांचे वर्णन, माणसे, वाचन याबाबत ललित लेखनाचे पुस्तक.   आपले घर आणि बालपण याबाबत थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक जगप्रसिद्ध ग्रंथालयात - या लेखात लंडन येथील ब्रिटिश लायब्ररी बाबत माहिती दिली आहे.  देवप्रियेची शोकांतिका या लेखात कान्होपात्राची भक्ती आणि इतर माहिती मला प्रथमच समजली.  हरे राम हरे कृष्ण या लेखात श्री प्रभुपाद स्वामी यांनी इस्कॉन मंदिर  आणि जगात कृष्णाबाबत प्रचाराबाबत घेतलेले कष्ट याबाबत सुंदर लिखाण केले आहे.  शिवभक्त बसवकल्याण, श्रीमंत शिवभूमी हे लेखपण वाचनीय आहेत. हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा