स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघ शिवतीर्थनगर पुणे यांच्या २१ व्या वर्धापन दिनानिमीत्य कांचनसंध्या - सदाबहार हिंदी व मराठी गीतांची मैफिल कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका डॉ सौ अनघा राजवाडे. स्वातंत्रवीर सावरकर यांना आदरांजली वाहून जय जय देव शिवराया या आरतीने मैफिलीचा प्रारंभ झाला. उंबरठा सिनेमातील - गगन सदन तेजोमय, भाभी की चुडिया सिनेमातील ज्योती कलश झलके, ऊन पाऊस सिनेमातील ग दि मा चे - खेड्यामधले घर कौलारू ..अनपढ मधील जिया लेके जियो. सुरेश भट यांचे मी मज हरपून बसलेग ..बोले रे पप्पी हरा, कुसुमाग्रजांचे - हे सुरांनो चंद्र व्हा ,हसले मनी चांदणे, आझाद सिनेमातील - अपलम चपलम, सुधीर मोघे यांचे साजणा पुन्हा स्मरशील का, अमरभूपाळी सिनेमातील लावणी - लटपट लटपट तुझे चालणे ..तिसरी कदम सिनेमातील पान खाये सय्या हमारो,..कट्यार काळजात घुसली मधील - मन मंदिरा तेजाने .. ही गाणी गायली. आरती, प्रार्थना, आईची आठवण, नाट्यगीत, लावणी, भावगीत अशी १४ मराठी हिंदी गाणी सुरेल आवाजात गायली आणि रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले. काही गाण्यांना वन्स मोर मिळाला. कार्यक्रम छान पार पडला. डॉ अ...