मानसी पांडे यांच्या मातोश्री वाढदिवस
आज आपल्या मातोश्रींचा वाढदिवस.. मला वाटते ७५ मध्ये पदार्पण.. वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, स्वयंपाकपाणी, पुस्तक वाचन, कष्टाळू, समाधानीवृत्ती .. हे त्यांचे गुण मला भावले. मार्च २०१९ साली आईचा वाढदिवस आमच्याकडे साजरा झाला होता. याची आठवण झाली. निकिता आणि महिता यांच्यामुळे आपल्या थोर माउलीचे पाय आमच्या वास्तूस लाभले होते. माझ्या आईचे आणि आपल्या मातोश्रींचे विचार मिळतेजुळते होते. हा एक योगायोग. ही सारी दिगंबरांची कृपा... आपल्या मातोश्रींचे भावी आयुष्य सुखसमाधान आणि आरोग्यदायी जावो हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना...या प्रसंगी आम्हा सर्वांचा आदरपुर्ण साष्टांग नमस्कार त्यांना जरूर कळवा.. जीवेत शरदः शतं...दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...


Comments
Post a Comment