पुणे आकाशवाणी "चिंतन"
आज सकाळी ६.३० वाजता पुणे आकाशवाणीवर "चिंतन" सदरात मंगला गोडबोले यांचे बोलू का नको या विषयावर विचार ऐकले. माणसाला नेहमी प्रश्न पडतो हे बोलू का नको , हे लिहू का नको .. हे सांगू का नको .. हे बोलले तर पुढच्यास काय वाटेल.. पुढच्या माणसाच्या भावना दुखावल्या जातील का ... बोलण्या आधी दहादा विचार करावा म्हणतात..नाहीतर बोलून पश्चाताप ..लिहिण्याचे तसे नाही.. आधी वाटते हे लिहू का नको.. पण लिहिल्याने मनातील उबळ व्यक्त होऊन मन हलके होते. लिहायचाआधी माणूस विचार करतो. लिहून झाल्यावर पण विचार करता येतो. तेव्हा माणसाने लिहून मोकळे व्हावे..जेव्हा हे बोलू का नको.. तेव्हा बोलू नका... पण लिहावे की नको तेव्हा जरूर लिहा.. तेव्हा सर्वप्रथम पेन हाती घ्या... चिंतन खूप चिंतनशील होते. मला पण हे कधी लिहून आपणास कळवतो असे झाले म्हणून हे लिखाण घडले.. आपण पेन हाती घेऊन मला जरूर प्रतिसाद द्याल..
Comments
Post a Comment