पुस्तक वाचन - 4

 






डेझर्टर - विजय देवधर


माझ्या मित्राच्या सांगण्यावरून "विश्वास" ग्रंथालयातून "डेझर्टर " हे विजय देवधर यांचे पुस्तक वाचले. मूळ लेखक गंथर बांहमान. अनुवाद - विजय देवधर. युद्धकाळात सैन्यातून - विशेषतः आघाडी फळीतून पळून जाणे आणि पुढे आपला जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणे .. अशी अतिशय रोमहर्षक आणि चित्तथरारक साहसकथा  असे हे पुस्तक आहे. नेहमी पुढे काय होते याचे कुतूहल राहते... मला अतिशय आवडले.  अनुवाद उत्तम केला आहे.


 यात सर्वात शेवट लेखक म्हणतो -


जर्मन युद्धआघाडीवर पळालेला कुरेयर गंथर बान्हमान् याला ब्रिटिशांच्या एका गस्ती पथकानं बीर-अल्-हशीम किल्ल्यात आपल्या ताब्यात घेतलं, नि नंतर त्याची रवानगी ब्रिटनमधल्या युद्धकैदी तळावर केली. गंथर बान्हमान् तिथं आठ वर्ष राहिला. तिथल्या वास्तव्यात त्यानं इंग्लिश भाषा शिकून घेतली, आणि नंतर आपल्या धाडसी पलायनाची रोमहर्षक हकीगत त्यानं इंग्लिश भाषेमधून लिहून काढली. त्याच्या या अजोड साहसकथेला इंग्लंडमध्येच पुस्तकरूपानं प्रसिद्धी मिळाली..


हे पुस्तक बरेच गाजले.  यात वाचकांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सवड काढून हे पुस्तक जरूर वाचावे.





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा