शिवथरघळ, मांढरदेवी
शिवथरघळ प्रवासासाठी सकाळी ६.३० वाजता पुणे सोडले. भोर येथे नास्ता करून वरंधा घाटातून सकाळी ९.४५ वाजता शिवथरघळ येथे सुखरूप पोचलो. वाटेत मोठे डोंगर, धरणाचे पाणी, रमणीय निसर्ग पाहायला मिळाले. शिवथरघळ याठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ आपले शिष्य श्री कल्याण स्वामी यांच्याकडून लिहून घेतला. घळीमध्ये निरव शांतता, आजूबाजूस निसर्गाची साथ आहेच. घळीमध्ये थोडावेळ ध्यान करायला उत्तम वातावरण. १९३० साली श्री शंकर देव यांनी हे स्थान शोधून काढले. याठिकाणी दुपारी प्रसाद हा मिळतो. येथे समर्थ यांचे साहित्य आणि इतर पुस्तके मिळू शकतात. बाजूला चहापानासाठी छोटे हॉटेल आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतंच नेट वर्क कव्हरेज मिळू शकत नाही. अमेरिकन संस्था NASA यांनी पण प्रयोग करून पाहिले. जगात असे एकमेव ठिकाण . येथून आम्ही मांढरदेवी साठी भोरमार्गे प्रयाण केले. मांढरदेवीस जाताना गाडी नागमोळी रस्त्यावरुन जाते. येथील घाट उंचच्या उंच आहे. सह्यांद्रीचे डोंगर पाहण्याजोगे आहेत. मांढरदेवी मंदिर उंच डोंगरावर आहे. डोंगऱ्याच्या पायथाशी देवस्थान तर्फे छोटी गाडीची (मोफत) सोय आहे. मंदिरातील काळूबाई देवीची मूर्ती प्रसन्न आणि देखणी आहे. दर्शन घेऊन बरे वाटले. पूर्णिमेनिमित्य बरीच गर्दी होती.मांढरदेवी वरून आम्ही वाईस दुपारी २.३० वाजता गणपती मंदिराजवळ पोचलो. प्रथम पोटपूजा करून वाईचा ढोल्या गणपती आणि बाजूचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर बघितले. दोन्ही मंदिर प्रशस्त आहेत. येथील घाटावर जाऊन आलो. संध्याकाळी पाच वाजता वाई सोडून पुण्यास परतलो. वाटेत श्री बनेश्वर मंदिरास भेट दिली. आमच्या प्रवास उत्तम पार पडला. बरेच दिवसातून शिवथरघळ या ठिकाणी भेट द्यायचे द्यायचे असे मनात होते. मनास आनंद झाला.सर्वानी शिवथरघळ येथे जरूर भेट द्यावी. पावसाळ्यात गेला तर धबधब्याचा आनंद लाभेल. शिवथरघळीत कृपया डोके वाकवून चालावे लागते. नाहीतरी संत रामदास स्वामी यांच्यापुढे आपण झुकलेच पाहिजे नाही का .... ..श्री समर्थ रामदास खरंच ग्रेट... जय जय रघुवीर समर्थ.. श्री राम जय राम जय जय राम.. काळूबाईच्या नावाने चांगभलं.




















Comments
Post a Comment