मी काय वाचले -16 -आठवणी उगारच्या अर्थात सोनेरी दिवस
नमस्कार,
माझ्या सौ.च्या मावशीचे यजमान श्री प्रफुल्लराव अनिखिंडी यांनी मला श्री उमाकांत गणेश कुलकर्णी यांनी लिहिलेले "आठवणी उगारच्या अर्थात सोनेरी दिवस" हे पुस्तक वाचायला पाठवले.
पुस्तकातील - पोस्ट ऑफिस, कोजागिरी, जत्रा, श्रावण, दिवाळी, खेळ क्रिकेट, हळदीकुंकू, गिरणी, फिरणे, पोहणे, टॉकीज .. याबाबत सुंदर आठवणी लिहिल्या आहेत. या आठवणी वाचल्यावर पन्नास वर्षापूर्वीचे सारे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. विशेषतः दिवाळी मधील शिंप्याकडील कपडे शिलाई आणि गिरणीत दळप .. हे प्रसंग मी पण अनुभवले आहेत. छोटे छोटे प्रसंग.. आठवणी खरंच उत्तम शब्दात व्यक्त केल्या आहेत. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप मजा आणि आनंद मिळायचा. म्हणतात ना .. जुने ते सोने..
या सोनेरी आठवणींच्या पुस्तकास आपल्या बालमैत्रीणीची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकास आपल्या वर्गमैत्रिणीचा आशीर्वाद म्हणजे - सोनेपे सुहागा .. नाही का ...
आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण - हे मला खूप भावून गेले.
माझे बालपण चिकोडी गावात गेले. चिकोडी -मिरज/सांगली प्रवास करताना गाडीतून उगार स्टॉप - उगार गावाची पाटी खिडकीतून पाहत होतो. मला खूप त्यावेळी वाटत होते एकदा तरी गावात जावे. पण योग आला नाही. श्री उमाकांत गणेश कुलकर्णी यांच्या आठवणी उगारच्या - या पुस्तकाने मला उगार गावाचे खरे दर्शन घडले. लेखकास मनापासून धन्यवाद आणि पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.. दीपावली निमित्य हार्दिक शुभेच्छा.. शुभ दिवाळी ...
चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - E -३०२ सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटी कोथरूड पुणे - ४११०३८
मोबाईल - ७७६७०९१०६९
प्रिय श्री.चंद्रशेखर कुलकर्णी,
सप्रेम नमस्कार,
माझे 'उगार' संबंधातील आठवणींचे पुस्तक वाचून आपण दिलेला 'छान'अभिप्राय वाचून फार बरं वाटलं. माझ्या बालमित्रांनी त्यांचे अभिप्राय नोंदवले आहेतच पण एका सुज्ञ अपरिचित वाचकांकडून 'छान' अशी प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. मी लिहिलेल्या कोणत्याही पोस्टवर प्रिय प्रफुल्लही लगेच आवर्जून प्रतिक्रिया देत असतो.आमचा बाल व वर्ग मित्रमैत्रिणींचा ग्रुप खूपच ॲक्टिव असून आम्ही वारंवार काहितरी निमित्ताने भेटण्याचा प्रयत्न करतो.
असो.या निमित्ताने आपला परिचय झाला.बरे वाटले.'चंद्रशेखर'हे नांवही खूप छान आहे आणि ते तशाच व्यक्तींना शोभते!!
उमाकांत ग.कुलकर्णी, बेळगांव
Comments
Post a Comment