सासवड ट्रिप
हडपसर - सासवड PMT बसने आम्ही सासवडला सकाळी १० वाजता पोचलो. संगमेश्वर हे पांडवकालीन मंदिर कऱ्हा आणि चाम्बली नदीच्या संगमावर वसले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग मंदिर आणि उत्तम कोरीव काम पाहण्याजोगे. आता नदीला पाणी नाही. याठिकाणी विवाहापूर्वीचे शूटिंग होते. पेशवेकालीन श्री पुरंदरे वाडा पाहिला . बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची समाधी, वाटेत श्री प्र के अत्रे यांचे घर पाटी पण बाहेरून बघितली. सासवड येथील श्री भैरवनाथ मंदिरपण पाहण्याजोगे आहे. हे मोठे आणि शांत प्रशस्त आहे.संत सोपानदेव देवस्थान मध्ये श्री सोपानदेव यांची समाधी - श्री दत्त मंदिर - संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर. येथील श्री नागेश्वर मंदिर - या मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपण एका कोपरात हळू आवाजात बोललात तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात स्पष्टपणे ऐकू येते. हा एक पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आवारात एक गणेश वृक्ष (चिंचेचा वृक्ष) आहे. येथून श्री सोपानदेव यांनी संजीवन समाधीचे प्रवेशद्वार आहे. या दिव्य वृक्षाचे स्मूक्ष निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते. हे मनास भावले. एक चमत्कार. सासवड जसे जवळ येते तसे "मिसळ" याचे पीक आजूबाजूला पाहायला मिळते. आम्हीपण सासवड येथे चविष्ट मिसळीवर ताव मारलाच. सासवड पाहून आम्ही घरी तीन वाजता परतलो. संत सोपानदेव देवस्थान आणि श्री संगमेश्वर जरून पाहावे.


















Comments
Post a Comment