गणपतीपुळे प्रवास - १

 





औदुंबर ट्रॅव्हल कंपनीच्या बसने आम्ही सकाळी ९.३० वाजता गणपतीपुळे येथे पोचलो. सकाळी आवरून नास्ता करून देवदर्शनसाठी देवळात जाऊन दर्शन घेतले. बारा वाजता आरतीस हजेरी लावून देवळातच प्रसाद घेऊन रूमवर परतलो.  संध्याकाळी  समुद्रावर पाण्याच्या लाटांमध्ये आनंद घेतला. समुद्र खूप स्वच्छ आहे.  एक किलोमीटरची देवळानजीक प्रदिक्षणा पूर्ण केली.  येथे सुंदर पायऱ्या आणि आसपास झाडी आहे.  समुद्र पण दिसतो. देवळासमोर समुद्र आहे.  येथील परिसर रमणीय आणि स्वच्छ, सुंदर आहे.


जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी लग्नापूर्वी माझी मोठी बहीण देवरुख येथे नोकरीस असताना मी पुण्याहून देवरुख येथे गेलो होतो. तेव्हा बहिणीने मला प्रथम गणपतीपुळे दर्शन घडवले होते. मंदिरानजीक राहण्यासाठी रूम होत्या आणि रूमच्या खिडकीतून समुद्र आणि लाटा दिसत होत्या.  आता काळाच्या ओघात ती खिडकीही नाहीशी झाली आणि माझी मोठी बहीणपण मला २५ वर्षांपूर्वी सोडून गेली.  माझ्या मनाच्या खिडकीवर आठवणींच्या लाटा जोरदार आदळत होत्या आणि मनाच्या खोलीत पाणी आले होते. अर्थात वरून ती माझा whatsapp मेसेज वाचत असेलच...  असो.  गतस्मृतींना उजाळा.. गणपतीपुळे ठिकाण रमणीय आणि प्रसन्न आहे. जरूर भेट द्यावे. पण समुद्रात जाताना अधिक काळजी आणि खबरदारी जरूर घ्यावी 











Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा