पावस श्री स्वामी स्वरूपानंद समाधीचे दर्शन

 







गणपती पुळ्याहून रत्नागिरी मार्गे  - पावसला दुपारी १ वाजता पोचलो. श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  समाधीजवळ खूप मनास प्रसन्न वाटले.  समाधीपुढे मोठा हॉल आहे. तिथे स्वामींची ग्रंथसंपदा वाचावयास ठेवली आहे.  भिंतीवर स्वामींचे संदेश आणि संतांचे फोटो लावले आहेत.  बाजूलास ध्यान मंदिर आणि स्वामी त्या खोलीत जन्मले ते घर आहे.  दुपारी १ ते २.३० पर्यंत प्रसाद असतो.  येथे भक्त निवासाची सोय उपलब्ध आहे. समाधीपुढे मी पाच मिनटे शांत बसलो होतो. जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी लग्नापूर्वी माझी मोठी बहीण देवरुख येथे नोकरीस असताना मी पुण्याहून देवरुख येथे गेलो होतो. तेव्हा बहिणीने मला प्रथम गणपती पुळ्याहून पावसला समाधी दर्शन घडवून आणले होते.  तेव्हा नुसतेच समाधी आणि पुढे हॉल होता. २५ वर्षांपूर्वीच स्वामींनी माझ्या मोठ्या बहिणीस बोलावून घेतले. मला तिची आठवण झाली. ती वरून पाहत असेलच म्हणा. असो..गत स्मृतींना उजाळा..


स्वामींनी सोहं चा मंत्र भक्तांना दिला आहे.  स्वामींनीं अत्यंत सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी ओवीरूप लिहिली आहे. "सार्थ ज्ञानेश्वरी" - स्वामी स्वरूपानंद - हा ग्रंथ माझ्या घरी आहे (ती. पुष्पाताई घाटपांडे यांची कृपा). मी जरी रोज सार्थ ज्ञानेश्वरी" वाचत नसलो तरी स्वामींचा "सोहं" गोष पहाटे ऐकतो आणि म्हणतो. खूप श्रवणीय आहे आणि ऐकल्यावर दिवसभर मनात घुमत राहतो. बरेच दिवसापासून पावसला जायचे असे मनात होते.  योग आला. बरे वाटले.समाधी मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे.





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा