गणपतीपुळे प्रवास - 2 - "कविवर्य केशवसुत स्मारक"

 





नुकताच आम्ही गणपतीपुळे, पावस,रत्नागिरी,गुहागर, हेदवी,वेळणेश्वर दौरा करून आलो. गणपतीपुळे जवळ मालगुंड गावातील "कविवर्य केशवसुत स्मारक" यास भेट देण्याचा योग आला. कोकण मराठी साहित्य परिषद यांनी कवी केशवसुत यांचे स्मारक उभे केले आहे. बाजूलाच केशवसुत जेथे जन्मले ते जुने कौलारू घरही आहे. स्मारक वास्तूत दोन मोठी दालने - एकामध्ये ग्रंथालय, वाचनालय अभ्यासिका तर दुसऱ्या दालनात केशवसुतोत्तर महत्वाच्या मराठी कवितांचे आधुनिक मराठी काव्य संपदा - अल्पपरिचय आणि गाजलेल्या कविता प्रदर्शित केल्या आहेत. केशवसुत यांच्या कविता एक भागात आहेत.  या कविता आणि इतर दालने पाहून मनास आनंद झाला. स्मारक वस्तू अतिशय देखणी आणि भव्य आहे. केशवसुत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे - मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे - असे गौरवाने कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात (८ मे १९९४) म्हटले आहे.  मला हे स्मारक आणि आसपासचा परिसर मनास भावून गेला.  मराठी साहित्यप्रेमीनी जरूर या स्मारकास भेट द्यावी म्हणून हे लिखाण.. काही फोटो.. 












Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा