दिवाळी पाडवा - संगीत मैफिलीचा कार्यक्रम
आज दिवाळी पाडवानिमित्य कर्नल्स क्यूब यांनी श्री कल्याण हुद्दार यांच्या संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मैफिलीची सुरुवात राग भैरव - जागो मोहन प्यारे या गाण्याने झाली. काही नाट्य गीते, अभंग आणि रागदारी गीते सादर केली. नाट्य आणि रागदारी गीतात - जय शंकरा .. हे सखी शशीवदने, देवी दयानी भगवती..अभंगामध्ये तुकारामांचे आणि इतर अभंगात - सावळे सुंदर रूप मनोहर..ज्ञानियांचा राजा, हरी भजनाविण काळ घालवू नकोरे, संत भाव पंढरीत, अबीर गुलाल उधळीत रंग...अब कृपा करो श्रीराम .. मैफिलीची सांगता भैरवी मध्ये - कैवल्याचा चांदण्या .. या गीताने झाली. सर्व गीते अप्रतिम सुरात गायली गेली आणि सारे रसिक तल्लीन झाले होते. तबल्यावर श्री विशाल मोरे आणि हार्मोनियम वर श्री केळकर यांनी उत्तम साथ दिली. आज पहाटे इतरठिकाणीपण "दिवाळी पहाट" कार्यक्रम असून सुद्धा सभागृह तुडुंब भरले होते काही रसिक बाहेर उभे राहून गाण्याचा आस्वाद घेत होते. प्रत्येक गाण्याच्या सुरेल स्वरास आणि उत्तम साजेसा ताल याना श्रोत्यांनी ऊस्फूर्त दाद दिली. गाण्याच्या मैफिलीनंतर सारेच नि:शब्द अश्या शब्दात कौतुक करत श्री नरेंद्र डांगी यांनी आभार व्यक्त केले.


Comments
Post a Comment