"गुलमोहर" - चित्रपट -2

 




नुकताच राहुल चित्तेला यांनी दिग्दर्शित केलेला "गुलमोहर" हा सिनेमा पाहिला. एक उच्चभ्रू कुटुंबातील कथानक.. एकत्र कुटुंबात आजी, आई वडील, मुलंमुली, नातवंडे,नातसून.. असे मोठे कुटुंब एका फ्लॅटमध्ये  राहत असतात .  एकत्र राहत असलेतरी बाप-लेक, आई-मुलगी नात्यात दुरावा असतो.  सगळे एकत्र एका फ्लॅट मध्ये राहत असलेतरी या फ्लॅटमध्ये प्रत्येकाचा एक एक फ्लॅट आहे,  असे चिडून पिता म्हणतो.. ही एक कौटुंबिक कहाणी आहे.  सुख-दुःखात प्रत्येकानी एकमेकांना समजून आनंदाने राहावे आणि घरगुती समारंभ साजरे करावे.. माणसाकडे किती संपत्ती, पैसा, फ्लॅट यापेक्षा समजंस्याने, कुटुंबात  संवाद, प्रेम असणे हे महत्वाचे हा संदेश देऊन या चित्रपट संपतो.  चित्रपटात - बाप्पाची प्रमुख भूमिका मनोज बाजपेयी तर आजीची भूमिका एव्हरग्रीन शर्मिला टागोर.  या दोघांनी उत्तम भूमिका केली आहे.. बाकी दिग्दर्शन उत्तम झाले आहे. चित्रपट जरूर पाहावा. माझ्या चिरंजीवांनी या चित्रपटाची शिफारस करून आम्हाला घरीच चित्रपट दाखवला. चित्रपट आवडला.. म्हणून आपणास शेयर करतो..

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा