श्री नागेश्वर मंदिर आणि श्री त्रिशुंडी गणपती मंदिरास भेट
सोमवारपेठ पुणे येथील भागातील श्री नागेश्वर मंदिर आणि श्री त्रिशुंडी गणपती मंदिरास भेट दिली. श्री नागेश्वर मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे अति प्राचीन पेशवेकालीन मंदिर .. येथे स्वयंभू शिवलिंग आहे. हे मंदिर एका वाडा परिसरात शांत वातावरणात वसले आहे. येथून जवळच श्री त्रिशुंडी गणपती मंदिर आहे. हे 1754 साली बांधलेले पेशवेकालीन गणपती मंदिर... गणपतीस तीन सोंड व सहा हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी वसलेली असून गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे. यामुळे या गणेशास "त्रिशुंड मयूर गणेश " म्हणून ओळखले जाते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर देवनागरी, संस्कृत आणि पारशी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे. मंदिराच्या खाली त्याच आकाराचे तळघर आहे. तळघरात दलपतगीर महारांची समाधी आहे. तळघरात गुढघाभर पाणी वर्षभर असते. हे बंद असते. या दोन्ही विशेष अर्वाचीन मंदिरास जरूर भेट द्या.. गणपती बाप्पा मोरया
कसबा गणपती, दगडूशेट गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिरास भेट दिल्यानंतर पुना गेस्ट हाऊस येथे महाराष्ट्रीयन स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.







Comments
Post a Comment