"प्यासा " सिनेमा
१७ ऑक्टोबर २३ - DD National चॅनेलवर रात्री ९.३० वाजता स्पेशल "वहिदा" सिनेमा मध्ये "प्यासा " सिनेमा दूरदर्शन वर पाहिला. हा सिनेमा गुरुदत्त यांनी १९५७ साली दिग्दर्शित केला. हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा माझ्या जन्मापूर्वीचा.. मी प्रथमच पाहिला. फक्त मस्तील चॅनेलवर काही गाणी ऐकली होती. यातील वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांचा अभिनय, गाणी... अतिशय उत्तम...सिनेमा ९.३० ते ११.५० पर्यंत चालू होता मध्ये एकपण जाहिरात नव्हती. एरव्ही दहाच्या आधी टीव्ही पाहताना मला नेहमी पेंग येते पण हा सिनेमा पाहताना - The End .. येथपर्यंत झोप कोठे पळाली .. ? असे गमतीने सौ.म्हणाली... बहुतेक ही "वहिदा"ची किमया...वहिदाच्या आणि गुरुदत्त यांच्या अभिनयास मानाचा मुजरा.. Hats off to Gurudatta for excellent direction .. class movie
Comments
Post a Comment