सिल्वरक्रेस्ट हौसिंग सोसायटीं गणपती उत्सव 2023

 



आमच्या सिल्वरक्रेस्ट हौसिंग सोसायटीं गणपती विसर्जनाने  गणपती उत्सवाची सांगता झाली. मंगळवार दि. 19.09.2023 गणपती  बाप्पा विराजमान झाले. दररोज सकाळ संध्याकाळ आरती प्रसाद कार्यक्रम असे.  विशेषतः संध्याकाळच्या आरती प्रसंगी क्लब हाऊस गणपती भक्तांनी तुडुंब भरलेले - पाच आरत्या, मंत्रपुष्प, प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरया या गजराने दणाणून जात असे.  या मंगलमय वातावरणीची स्पंदने मनास आल्हाद देत असत. हे एक प्रकारे स्वर्ग सुखच...  आरतीनंतर प्रसाद हासुद्धा चविष्ट दररोज आगळावेगळा आणि मस्त जेणेंकरून पोटोबा खुश..गणपती उत्सवादरम्यान लहान मुलं (दोन वर्ष ) ते जेष्ठ मंडळींसाठी खेळ आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.   आरती झाल्यावर विविध कलागुण दर्शन मनोरंजनपर कार्यक्रम झाले. यात नृत्य, नाट्यछटा, पुण्यातील गणपती, यशस्वी आणि कर्तृवान महिला याना वंदन, गाणे .. असे कार्यक्रम झाले. सर्वानी आनंदाने सहभाग घेऊन आपली कला सादर केली. विशेषतः प्रत्येक गुणदर्शन इतके सुंदर होते की सारखाच वन्स मोर मिळत होता.


मंगळवार ते शनिवार पाच दिवस प्रत्येक विंगनि आरती/प्रसाद, एक दिवस श्री सत्यनारायण पूजा  यात उत्तम सहभाग घेतला.  शनिवारी बाप्पाना निरोप .. सर्वानी जड  अंतःकरणांनी वाजतागात दिला.  पावसानी बाप्पांचे गावाला जाण्याचे थोडे लांबले.. आपल्या सोसायटीतून पाय निघत नव्हते बहुतेक ..शेवटी बक्षिस समारंभ, 75 वर्ष पूर्ण जेष्ठांचा सत्कार, सोसायटीतील विशेष उल्लेखनीय कामाबाबत विशेष पुरस्कार, आणि इतर पुरस्कार आणि आभार यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.    


गणपती उत्सवात प्रथमपासून शेवट पर्यंत सर्वानी आनंदाने भाग घेऊन सुरळीत पार पाडला. प्रत्येकाचे नाव उल्लेख करणे मनात असूनसुद्धा जमत नाही क्षमस्व.. सर्वांच्या अथक परिश्रमबाबत मनापासून नमस्कार आणि धन्यवाद.. सर्वांच्या सहकार्य आणि आनंदी सहभाग यामुळे गणपती उत्सव दणदणीत झोकात संपन्न झाला.  अर्थात ही  सारी बाप्पांची कृपा .. याबाबत गणपती उत्सव समिती आणि सिल्व्हर क्रेस्ट समिती यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.. असेच सहकार्य आणि आनंदी सहभाग आपण उत्सव समिती आणि सिल्व्हर क्रेस्ट समितीस कायम देऊ या.. आपल्या सोसायटीतील सर्वाना सुखसमाधान आणि सुआरोग्य लाभो हीच श्री गणरायास मनापासून प्रार्थना .. गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया .. पुढच्यावर्षी लवकर या .. E-302 सिल्वरक्रेस्ट हौसिंग सोसायटीं 




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा