"Health through Ayurveda " - डॉ योगिनी पाटील

 



ऑफिसमध्ये डॉ योगिनी पाटील यांचे "Health through Ayurveda " या विषयावर भाषण कार्यक्रम आयोजित केला होता. आयुर्वेद बाबत माहिती दिली. आयृर्वेदाची उत्पत्ती, कोणत्या वेदात, अष्टांग आयुर्वेद ,आरोग्याची व्याख्या.. याबाबत प्राथमिक माहिती दिली. चवनप्राश याबाबत गोष्ट, चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याची आयुर्वेदावर ऑडिओ विडिओ, दाखवला.  आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यत्मिक, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोष, दोष, धातू, मल,धर्म,अर्थ काम, मोक्ष यामध्ये आरोग्याचे महत्व, धर्माचा आणि ब्रह्मचर्य यांचा आयृवेदातील खरा अर्थ या विषयावर प्रकाश टाकला गेला.  


आपली दिनचर्या, आहार, विहार आचार विचार कसे हवेत याबाबत आयुर्वेद काय सांगते याबाबत माहिती दिली. आहार, निद्रा, विचार, सौमनस्य  - माणूस आणि प्राणी यातील फरक... समत्व यांचे महत्व.. कोणत्या १३ बाबी (तहान भूक,उचकी, शिंक....) रोखुन ठेवायच्या नाही, राग, लोभ, मद, मत्सर, काम, क्रोध या विकारावर संयम ठेवून सदविचार आणि सदवर्तन हवे म्हणजे स्वास्थ नेहमी चांगले राहते.  आयुर्वेदातील श्लोक आणि त्यांचा अर्थ सांगितला.  आयुर्वेदासारखा मोठा आणि गहन विषय थोडक्यात मनोरंजकपणे समजून सांगितला. कार्यक्रमादरम्यान आपल्या सुंदर जगण्यासाठी अतिशय महत्वाच्या टिप्स मिळाल्यामुळे श्रोत्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि समाधान दिसत होते. श्रोत्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे डॉ. योगिनी पाटील यांनी दिली. सोनिया मॅडमनी डॉ.योगिनी पाटील यांची ओळख आणि आभारप्रदर्शन भाषणात थोडक्यात आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रम श्रवणीय होता. मनापासून सर्वाना आवडला.  आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदातील बाबी शक्य तितक्या प्रमाणात आचरणात आणून आपले जीवन सुखी समाधानी आणि आरोग्यदायी बनवू या ...आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती .. नाही का .. जीवेत शरदः शतं...










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा