जागतिक टपाल दिन -

 


आज ९ ऑक्टोबर २०२३ - जागतिक टपाल दिन -


टपाल म्हटल्यावर मला बालपणीचा काळ आठवला.  आमच्या लहानपणी टपाल हेच प्रामुख्याने संपर्क संवाद याचे साधन होते.  आपल्या आत्या, मावशी, काका याना आम्ही पत्राने खुशाली कळवत असे.  त्यांच्याकडूनही आमच्या पत्रास उत्तर येत असे.  शाळा सुटीदिवशी आम्ही दारात  पोस्टमनची आतुरतेने वाट पाहत असू. शेजारी पत्र आणि आमच्या घरी पत्र नाही म्हटल्यावर नाराज होत असू.

शाळा सुटल्यावर मी एक वकील यांच्याकडे पत्र लेखनासाठी जात असे.  त्यांना डोळ्याला दिसत नव्हते.  त्यांच्या मुलामुलींना खुशालीचे पत्रे, अशिलांना दोन ओळीची पत्रे (पुढील तारीख आणि फी घेऊन या मजकुराची) लिखाण असे. कधीकधी तोचतोच मजकूर या मुळे कंटाळा येत असे.


आमच्या घरी एक वयस्कर कामवाली होत्या त्यांचा मुलगा मुंबईस मिलमध्ये कामाला होता.  त्यांचापण एक डोळा कायमचा रजेवर गेला होता.  मुलास खुशाली आणि पैसे मागण्यांबाबत पत्र लिखाण काम असे. मनिऑर्डर मिळाल्यावर पोचपत्र असे. पुढे नोकरी निमित्य परगावी परत पत्र.. बँकेत नोकरी पण - काही काळ "स्टेनो" म्हणून परत पत्राचार.. लग्न ठरल्यावर प्रेम पत्रे...असो.   कोणाचा जन्म असो अगर मृत्यू .. आणि इतर समारंभ आणि आनंदी आणि दुःखद प्रसंगी पत्र पाठवण्याचा योग आला 

आजही एखादे पुस्तक वाचल्यावर त्या लेखकास अगर लेखिकेस आवर्जून पत्र पाठवतो.  त्यांचीपण पत्राने उत्तर येतात.  मला आठवते तेव्हा पत्राची किंमत पाच पैसे होती आज ती दसपट (पन्नास पॆसे) झाली आहे. तरी माझ्या दृष्टीने पत्राची किंमत करता येत नाही कारण त्यातून आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोचतात.  


पत्राचा संग्रह बाबत काही पुस्तके वाचली.  पूर्वी वर्तमानपत्रात - पत्रास पत्र - याबाबत कित्येक वाचकांची वाचनीय पत्रे वाचून मनास आनंद होत असे.   पत्राचे आपल्या जीवनात अमूल्य स्थान आहे. याबाबत शंका नाही...  आज टपाल दिनानिमित्य पत्रास मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.. आज टपाल दिनानिमित्य गतस्मृतींना उजाळा मिळाला आणि पत्राबाबत थोडे लिहावे म्हणून हे लिखाण 


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा