नरेंद्र (स्वामी विवेकानंद) ते नरेंद्र(मोदी) व्हाया अरविंद

 







२४ जून २०२३ - कर्नल्स क्यूब संस्थेने - नरेंद्र (स्वामी विवेकानंद) ते नरेंद्र(मोदी) व्हाया अरविंद - या विषयावर माधवी रघुवीर यांचे भाषण आयोजित केले होते.  कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.  स्वामी विवेकानंद यांचा काळ आणि आताचे नरेंद्र मोदी नेतृत्व चा भारत यांचा आढावा घेतला.  दोन्ही नरेंद्र यांच्यात  किती साम्य आहे हे दाखवून दिले. ब्रह्मर्षी - स्वामीजी हे ज्ञानयोद्धा (संन्यासी) राजश्री मोदी - कर्मयोद्धा आणि या दोघांमध्ये योगी अरविंद - हे मूल्ययोद्धा..स्वामीजी हे दरिद्री नारायण सेवा हा संकल्प आणि श्री मोदी हे प्रधानसेवक - जनता जनार्दन सेवा.. हे दोन्ही नेते - समाजाला बरोबर घेऊन जाणारे आहेत.  राष्ट्राची औद्योगिक, संरक्षण, वैचारिक आणि आर्थिक या क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे.  


पृथ्वीवरील भारत हा सर्वात श्रेष्ठ राष्ट आहे. घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, चीन म्हणजे स्वयंपाकघर, युरोप - शयनघर, जपान - बगीचा तर भारत म्हणजे देवघर.. संपूर्ण घरावर देवघराची सत्ता चालते.  योगी अरविंद यांच्याबाबत लहानपणीपासून क्रांतिकारक ते योगी प्रवासाबाबत थोड्यक्यात अध्यात्मिक महत्वाची माहिती सांगितली.  भरतभूमीतील संतांचे -समर्थ रामदास, शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला.  श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात घेतलेले निर्णय, त्यांचा अभ्यास, १८ तास काम आणि राष्ट्रासाठी त्यागीवृत्ती, व्यायाम, वेळेचे नियोजन याबाबत कौतुक केले.  work is worship - हा विचार, अत्यंत साधी राहणी, सुख दुःखात पाय जमिनीवर असणारा नेता असे अनेक गुण श्री मोदी यांची अंगी आहेत. भगवदगीतेत २६ गुण सांगितले आहेत. मन की बात या कार्यक्रमातून देशातील छोट्या खेडेगावातील  केलेल्या कामाचा गौरव, खेळाडूंशी संवाद, या सारखे २५ गोष्टी/उपक्रम यांचा उल्लेख करून श्री मोदीजींनी केलेली भारताची प्रगती यांचा आढावा घेतला. सध्या श्री मोदीजी यांचा अमेरिकेने केलेला सत्कार आणि गौरव यांचा आवर्जून उल्लेख केला.  शेवटी आपण सामान्यांनी आपला स्वार्थाचा परीघ रुंदावयाचा - आपली संस्कृती जपायची आणि संस्काराचा वारसा पुढील पिढीस द्यायचा. भाषण अत्यंत श्रवणीय होते. पाऊस वातावरण असलेतरी बरीच गर्दी होती. श्री कुमार फुले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.  जय हिंद ...भारत माता की जय ... 


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा