सौ.डॉ.गायत्री वाढदिवस..
18.06.2023
आज तुझा वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐तुला उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.. तू डॉक्टर ..तुझे आरोग्य म्हणजे आम्हाला पण छान आरोग्य .. साहजिक नाही का..तुझ्या अंगी वसलेल्या - वैद्यकीय ज्ञान, स्वयंपाक, रांगोळी, वाचन, लेखन, साहित्य, सेवाभाव, प्रवास, निसर्गाचे दर्शन इतरांना घडवणे, , समाधानीवृत्ती .. या आणि इतर .. गुणात नेहमी वाढ हो..तुझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून तू उत्तम संसार चालवत आहेस याचा अभिमान आणि कौतुक आम्हाला आहे. एका वेळी दोन्ही बाबी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच नाही का... तुला सुखसमाधान, शांती आणि आरोग्य लाभो हीच श्री शाकंबरी देवीस प्रार्थना 🙏आणि तुला भरपूर शक्ती मिळो हीच गायत्रीदेवी चरणी मनापासून प्रार्थना..🙏.आमच्या बागेतील मोगऱ्याची फुलांची छोटीशी भेट तुला पाठवत आहे. या फुलांचा सुगंध तुझ्या जीवनात नेहमी दरवळत राहो .. हीच सदिच्छा.. बाकी एरव्ही झाडाला एक दोन फुले येतात पण आज भरपूर फुले आली .. बहुतेक वाढदिवसानिमीत्य भेट देण्यासाठी असावीत काय योगायोग .. खरंच देव आपल्याला भरभरून देत असतो नाही का ...असो शुभम भवतु.. जीवेत शरद: शतं...


Comments
Post a Comment