मी काय वाचले -7
"आषाढ मेघ " - डॉ. सुमती क्षेत्रमाडे
"युगंधरा" कादंबरी नंतर - "आषाढ मेघ" हा कथासंग्रह वाचला. यात आषाढ मेघ, रेवती, शोध, अभिसार, सेतू, सादर भेट, अभिमान, कन्यादान, सहा महिने तेरा दिवस अश्या ९ कौटुंबिक कथा - सर्व कथा वाचनीय. या कथापैकी मला "अभिमान" ही कथा मनास भावली. विवाह इच्छुक मुलामुलींनी आणि विशेषतः भावी सासूबाई यांनी सवड काढून ही कथा जरूर वाचावी. आज आषाढस्य प्रथम दिवसे - आषाढ मेघ हा कथासंग्रह वाचला. काय योगायोग.. पण आकाशात मेघ नाहीत.. देवा आता लवकर पाऊस दे ..हीच मनापासून प्रार्थना...


Comments
Post a Comment