सौ.छायूच्या ६१ष्टी सोहळ्या

 



सौ.छायूच्या ६१ष्टी सोहळ्याच्या निमित्याने आपण आलात आणि आनंदाने सहभागी झालात धन्यवाद .. या निमित्याने छायुबाबत काय काय बोलू असे झाले.  तिने पदवीपूर्वी RMS  पोस्ट ऑफिसमध्ये स्वबळावर नोकरी मिळवली.  शिफ्ट ड्युटी नोकरी आणि रत्नागिरी, गोवा येथे बदली, बरोडा, पुणे येथे प्रशिक्षण..हे सांभाळून कष्ट आणि प्रामाणिकपणा यागुणावर पदोन्नती मिळवून सॉर्टींग स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवले   नोकरी करून आपल्या मुलीची शिक्षणे आणि नोकरी लग्ने उत्तमप्रकारे पार पाडली.  आपल्या संसारात तिला तिच्या यजमानांची मोलाची साथसंगत लाभली. असे म्हणतात Behind every successful man  there is a woman .. येथेमात्र उलटे आहे behind successful woman , there is man and that  is सुधीरराव ..तिच्या आयुष्यात युरोप सहल, नुकताच काशी यात्रा घडून आली. वेळेवर नोकरी, लग्न, पाल्याची शिक्षणे, लग्न.. प्रवास... या गोष्टी घडावयास देवाची कृपा लागते...पूर्वजन्मीची पुण्याई आणि थोरामोठ्याचे आशीर्वाद.. अर्थात या सुंदर सोहळ्यास आई दादा आणि इतर स्वर्गवासी नातलग आकाशातून हार्दिक शुभेच्छा देत असतील यात शंका नाही  सुखी जीवनात जर शंभर रुपये मिळाले तर ८० रुपये संसारावर, १० रुपये फुलावर आणि बाकी १० रुपये पुस्तकावर खर्च करावे ... असे म्हणतात.. या प्रसंगी छायूस मी - कोलाज - समृद्ध विचारांचा " या पुस्तकाची भेट देत आहे. भावी जीवन सुखा समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना आपल्या नातलागाकडून श्री शाकंभरी देवी चरणी प्रार्थना 🙏 🙏


10 जून 2023 - सौ छायुचा एकषष्ठी कार्यक्रम सोहळा श्री दत्त मल्हार  नरसोबावाडी येथे आयोजित केला होता.  होम हवन, नवग्रह शांती विधी पार पडले. साखरेची तुलाभार, वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सारे विधी उत्तम प्रकारे पार पडले. नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था उत्तम होती. छायुच्या फोटोचा कोलाज, फुलाची आणि इतर सजावट सुंदर होती. 61 खारीक बदाम यांनी बनवलेले यांच्या आरतीने औक्षण केले. 9 जून चिकोडी येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक आणि पालखी कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. भावी जीवन सुखा समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना आपल्या नातलागाकडून श्री शाकंभरी देवी चरणी प्रार्थना 


कार्यक्रमानंतर रिकाम्या वेळेत उपस्थित जोडप्यांनी आणि भाऊ आणि बहीण यांनी गंमत म्हणून तुला करून घेतली.. काहींचे पारडे खाली काहींचे वर झालेले दिसले. मजा आली.. पण आपल्या संसारात आणि जीवनात कोणीच उच्च आणि नीच पातळीवर नसतो. आपण सारे समान पातळीवर असतो..नाही का...? हाच संदेश आपण तुलाकडून ⚖️ घेऊ या.. मनातले विचार शेयर केले..


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा