"कोलाज : समृद्ध विचारांचा
४ जून २०२३ - सौ. मीना आंबेकर यांच्या "कोलाज : समृद्ध विचारांचा ह्या पाचव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉ सौ आरती ताई दातार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना - योगेश तांबे यांनी सूर निरागस हो या गीतांनी केली. लेखिका सौ. मीना आंबेकर यांच्या जीवनाच्या वाटचालीबाबत छोटीशी चित्रफीत दाखवली गेली. पुस्तकाच्या निर्मितीबाबत थोडक्यात आपले मनोगत लेखिका सौ. मीना आंबेकर यांनी व्यक्त केले. पुस्तकाच्या जडणघडणीत ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार मानले. पुस्तकातील "परत मिळेल का ?" या लेखाचे अभिवाचन दीप्ती आंबेकर यांनी केले. आंबेकर कुटुंबीयांचा समवेत पुस्तक प्रकाशन संत साहित्याच्या व्याख्यात्या - डॉ. सौ. आरती ताई दातार यांच्या हस्ते झाले.
आपल्या भाषणात सौ. आरती ताई यांनी लेखिका - मैत्री, शिक्षक, शिक्षण, निवृत्ती -प्रवृत्ती, प्रेयस - श्रेयस याबाबत आपले विचार मांडले. पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ ते मलपृष्ठ, अर्पणपत्रिका आणि पुस्तकातील ४० लेखांचे भरभरून कौतुक केले. पुस्तकाच्या इंद्रधनुष्य बाबत सविस्तर कल्पना सौ आरती ताई यांनी सुंदर विचार मांडले. ता - ताणाचा, ना - नाही - नकारांचा, पि - पिंडी ते ब्रह्मांडी, हि - हितकारक संदेश - वाचकांचे हित, नि - निसर्गाची संपन्नता - निसर्गाचे सौंदर्य टिपणे, पा- पानोपानी गप्पा, बोध देणे, जा - मनाच्या जाणीव समृद्ध करणे...परत मिळेल का ? - या भावलेल्या लेखाबाबत - माणसाने कसे जगावे, का जगावे - याबाबत बोध मिळतो. असे सौ. आरती ताई यांनी सांगितले. पुस्तकातील - नात्याच्या पलीकडले नाते, जगाला वेड लावणारा "व्हाट्सअँप", विमानातील चमत्कार, साधेपणातील श्रीमंती, वेदनांना निरोप. जी.पी, एस. या लेखाबाबत थोडक्यात आपले विचार व्यक्त केले. पुस्तकातील सर्वच्या सर्व लेखाबाबत बोलावे याचा मोह होतो. सर्व लेख मनाला आनंद, प्रसन्नता आणि समाधान देणारे आहेत असे सौ. आरती ताई यांनी आवर्जून सांगितले.
२०२१ मध्ये सौ. मीना आंबेकर यांच्या सहजीवनाची ५० वर्ष पूर्ण झाली. याचा आनंदानिमित्य साऱ्या रसिक श्रोत्यांना पुस्तक भेट देण्याचा संकल्प केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ लीनता आंबेकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. कार्यक्रमानंतर चविष्ट भोजनाचा लाभ श्रोत्यांनी घेतला. प्रकाशन सोहळा उत्तम प्रकारे संपन्न झाला. कोलाज : समृद्ध विचारांचा - या पुस्तकास मनापासून शुभेच्छा ..प्रा. सौ. मीना आंबेकर यांच्या हातून उत्तमोत्तम लिखाण घडू दे हीच सरस्वती देवीच्या चरणी मनापासून प्रार्थना ..कार्यक्रमाचे आमंत्रण डॉ. सौ.आरती ताई यांच्याकडून मिळाले . याबाबत डॉ. सौ. आरती ताई यांचा ऋणी आहे. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी मोबा. 7767091069

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment