मी काय वाचले -6
"युगंधरा" - डॉ. सुमती क्षेत्रमाडे
ही एक कौटुंबिक कादंबरी - सामान्य कुटुंबातील मुलीच्या करियर,नोकरी, घर याबाबत आहे. कादंबरी ४८० पानांची आहे. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुढे काय पुढे काय याबाबत बरीच उत्कंठा निर्माण करून हातातून सोडवत नाही. लेखिकेने उत्तम लिखाण करून सामान्य कुटुंबातील घरगुती अडीअडचणी, प्रश्न, होणारी घुसमट, मनातील इच्छा .. खूप सुंदर व्यक्त केले आहे. कादंबरी "युगा" या मुलीवर केंद्रित केली गेली आहे. "युगा" ही प्रेमळ, मनमिळाऊ, निस्वार्थी, परोपकारी, कुटुंबाचा/दुसऱ्याचा विचार प्रथम, घरकाम सांभाळून नोकरी करणारी .. अशी हुशार व्यक्ती...कादंबरी वाचल्यावर प्रत्येकाला युगा सारखी मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी, नातं.. हवी असे वाटते.. माणूस किती स्वार्थी नाही का ..कादंबरी संग्रही ठेवण्याजोगी आहे.
लेखिकेचे नावाबाबत बरेच आधी ऐकले होते. पण पुस्तक वाचले नव्हते. मध्यंतरी ऑफिसमधील मैत्रीण तुमच्या ग्रंथालयात "युगंधरा" हे पुस्तक आहे का? अशी विचारणा केली. मी ग्रंथालयात चौकशी केली. पुस्तक मिळाले.. तेव्हा तिथेपण या कादंबरीबाबत बरीच चर्चा झाली. एक सुंदर कादंबरी वाचण्याचा योगायोग लाभला.
Comments
Post a Comment