महिला दिन

 

८ मार्च .. जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.  कर्तृत्वान महिलांचा गौरव केला जातो. अर्थात आपल्या संस्कृतीत ३६५ दिवस महिलांचे असतात.  आपण वर्तमानपत्रात इतर महिलांच्याविषयी वाचतो, ऐकतो.  माझे मन मला म्हणाले तू तुझ्या कुटुंबियातील महिलांच्या कामगिरीबाबत कधी विचार केला आहेस का ..?  आणि एकदम माझे मन शालेय जीवनात असताना  माझ्या  कोल्हापूरच्या आत्याच्या घरी गेले. घर कसले ते एक आठ बाय दहाची खोली (खोलीत बऱ्याच गैरसोयी अधिकच) होत्या. आत्याच्या घरी काका आणि ४ मुले आणि १ मुलगी असा संसार.  स्वतः आत्या पायाच्या आजारांनी त्रस्त..काकांचा भविष्य आणि भटकी व्यवसाय.. तरीपण तिच्या घरी नातलग, इतर गावावरून आलेली मंडळी बरीच असायची. सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जवळजवळ किमान ४०-५० कप चहा होत असे.  दुपारी ४-५ लोक सहज जेवायला असत. आत्या आपले दुःख विसरून नेहमी  सर्वांचा पाहुणचार आनंदाने करत असे.  स्वयंपाक उत्तम - विशेषतः " वांगी" भाजी आणि आमटी अधिक चविष्ट असे.  मला तिचा संसार बघितल्यावर बहिणाबाई चे गाणे - अरे संसार संसार .हे आठवते. जणू बहिणाबाईंचे काव्यच ती जीवनात जगत होती.

चुलीवर, कोळशाची शेगडी, पिनचा स्टोव्ह, आणि शेवटी गॅस वर स्वयंपाक केलेला मी पाहिले.  आपल्या शारीरिक व्याधीमुळे आपले घर,चूल ..कधीच ती बाहेर पडत नसत. तिने अमाप कष्ट सोसले.  याबाबत जितके लिहावे तेव्हढे कमीच.. तिचे माहेरच्या मंडळींवर अधिक प्रेम .. आम्हा भाचे कंपनीवर जास्त कौतुक आणि माया.. तिच्या कार्याबाबत ती असताना मला लिहता आले नाही (त्यावेळी अक्कल नव्हती... असो ) ही  खंत मनी... ३०-४० वर्षांपूर्वी " बायकोचे कौतुक" करणे हे नवरदेवाच्या शब्दकोशात नव्हते..आणि त्याकाळी  बायका कौतुकाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पडत असत. कालाय तस्मै नमः ..असो ..महिला दिन म्हटल्यावर मला नेहमी माझ्या आत्याची आठवण होतेच.  तसेच इतर नातलग मंडळीत आई,आत्या, मावशी  - सख्या आणि चुलत-  यांचा समावेश होतोच आणि सर्वानी आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या कष्ट, कर्तव्य यांचे स्मरण होऊन अश्रुना थांबवू शकत नाही... महिला दिनानिमित्य ..कृतज्ञतेचे दोन शब्द सर्व महिलांसाठी.. सर्वाना सुआरोग्य लाभो हीच श्री शाकंबरी देवीस प्रार्थना ... 


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा