साहेबांचा वाढदिवस

 


आज ८ मार्च ..अनगळ अँड कंपनी चे सर्वेसर्वा श्री सुभाष अनगळ यांचा वाढदिवस. सरांनी आज वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आणि ८६ मध्ये पदार्पण केले.  त्यांचा दांडगा स्टॅमिना चिरतरुण मुद्रा यामुळे ते ८५ वर्षाचे वाटत नाही.  कालच मी सुविचारांची वही चाळत असताना मला ओशो यांचा एक विचार वाचनात आला. ते म्हणतात -  "If  you have lived your youth totally, you will remain young to the very last breath of your life.  Your body may become old but your freshness and youthfulness is a totally different phenomenon to your aging.  Aging is physcial, youthfulness is your approach towards Life ...

हा विचार तंतोतंत सरांना लागू पडतो.  याचा थोडक्यात अर्थ - माणसाने मनाने तरुण असावे..या वयात त्यांची नवीन शिकण्याची जिद्द, हौस,मोबाईल/whatsapp  वापर... हे कौतुकास्पद.. त्यांच्याबरोबर काम करीत असताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले त्यावेळी खूप कष्ट घेतले आणि आपल्या कामामुळे आपला बांधकाम धंदा जोमाने वाढवला आणि यश संपादन केले.  त्यांची कामगिरी पाहून AESA  या संस्थेने त्यांना "जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित केले. या अभिमानस्पद कार्यक्रमावेळी मी हजर होतो.  आपल्या व्यवसाय सांभाळून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पडल्या.. आपल्या मुलांची शिक्षण, इतर घरगुती समारंभ.... आज सरांना परतवंडे आहेत.  कित्येक सामाजिक संस्थांना देणगी दिली आहे.  श्री चतुर्श्रींगी देवस्थान ट्रस्ट आणि श्री दक्षिणामूर्ती ट्रस्ट... या ट्रस्ट वर काम करून सामाजिक कार्य केले आहे.

आपल्या धंद्यात काम करण्याऱ्या नोकरवर्गाचे ते हितचिंतक आहेत  वेळोवेळी शिक्षण, आजारपण आणि इतर अडीअडचणीत मदत केली आहेच. काम करीत असताना ते नेहमी आपल्याच कुटूंबातील एक सदस्य मानून आपुलकीने विचारपूस करतात.  आज ८ मार्च -  महिला दिन आहे. अनगळ आणि कंपनी चे ते साक्षात " माऊली"च आहेत.  सरांच्या वयाच्या शंभरी साठी हार्दिक शुभेच्छा..या वाटचालीत त्यांना उत्तम आरोग्य लाभो, भावी जीवन सुखासमाधानाचे जावो हीच प्रार्थना श्री शाकंभरी आणि चतुर्श्रींगी देवीस.. जीवेत शरद: शतं....

 चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - 0८.०३.२०२१.

Comments

  1. सुंदर मनोगत

    ReplyDelete
  2. थोडक्यात आणि सुंदर

    ReplyDelete
  3. नेहमी प्रमाणे छानच, विचारपूर्ण आणि आटोपशीर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा