मी काय वाचले - ३

 




विश्वास ग्रंथालयातून "बुकमार्क'" - लेखिका प्रज्ञा ओक. आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेक कर्तबगार आणि आदरणीय व्यक्ती बाबत सुंदर मनोगत..लेखिका एक लेखात म्हणते -  "मनांनी, गुणांनी तसच कर्तृत्वान अस्सल अशी माणसे मला आयुष्यात वारंवार भेटली, ही माझ्या आययूष्यातील समृद्धी समजते मी! त्या दृष्टीने  भरपूर श्रीमंत आहे मी.  बरं ही माणसं नुसती आयुष्यात येऊन जाताजाता भेटली असं नाही, तर ती माझ्या आयुष्यात कायम वसतीला आली. हे माझे भाग्य !"

हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि मला भावले हे पण माझे भाग्यच..प्रत्येक लेखामध्ये लेखिकेने माणसाच्या गुणाबाबत मनोगत व्यक्त करतांना जीवनाविषयी आपले विचार सुंदर शब्दात मांडले आहेत. ते आपल्या जीवनात उपयोगी पडतात आणि आपले जीवन सुखकर होते. पुस्तकातील शेवटी "माणसं " हा लेख मला खूप भावला.  या लेखिकेची मी आधी - ओशोंच्या प्रवंचनावर काही पुस्तके वाचली होती. लिखाण सुंदर आहेच.  "बुकमार्क" - हे बुक आपल्या संग्रही ठेवण्यासारखे असल्याने "मार्क' करून ठेवायला हरकत नाही...


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा