मी काय वाचले -४

"असीम आनंद "- राजयोगिनी शिवानी यांचा सुरेश ओबेराय यांच्याशी संवाद - मराठी अनुवाद : माधव जोशी संपादन : चेतन कोळी - असीम आनंद म्हणजे - जी कोणत्याही सीमित गोष्टीच्या, एका व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या अधीन नाही. अशी अवस्था. जी अप्रतिबंधित स्वातंत्र्य आणि अनियंत्रित आहे. जी कशाच्याही अधीन नसल्यानं तिला अपयशाची चिंता नाही. नातेसंबध म्हणजे काही कृती नव्हेत तर त्या कृती करताना आपण ज्या ऊर्जेची देवघेव करतो, ते म्हणजे नातेसंबध.

वस्तू, मालमत्ता, सुखसुविधेची साधनं या गोष्टी आपल्याला केवळ आराम देण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आल्या आहेत. आनंद ही आपली अंतर्गत निर्मिती असून तो बाह्यवस्तूवर कधीच अवलंबून नसतो. अध्यात्म आपल्याला सांगत, जे करायचं ते आनंदानं करा. अध्यात्म मला स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शक्ती देते.  असे अनेक शिवानी दीदींचे विचारासाठी हे पुस्तक जरूर वाचा.  या पुस्तकात आनंदाचा पासवर्ड, रहस्यभेद, सजग समृद्ध शांत आयुष्याची गुरुकिल्ली, आनंद म्हणजे काय? भावनिक परिपक्वता, ताणतणावातून मुक्त... वगैरे मुद्धे या पुस्तकात दिले आहेत.

मी BK शिवानी यांचा "अवेकनिंग विथ ब्रह्माकुमारीज" हा TV वरील कार्यक्रम नेहमी पाहतो. BK शिवानी यांचे विचार आणि बोलणे सुंदर आणि श्रवणीय असते. तरुणवर्गाच्या शिवानी लाडक्या आहेत. मी पण त्यांचा फॅन आहे. 

Comments

  1. संयत बोलणे म्हणजे काय ते शिवानी दीदींकडून शिकावे. विचार तर प्रगल्भ आहेतच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा