Posts

सौ नीरा मावशी

  आमचे दादा पुण्याला ऑफिस कामानिमित आल्यावर आपल्या नातेवाईकाकडे वेळ काढून जरूर सर्वांना भेटत असत. पुण्याचा दौरा झाल्यावर चिकोडीला आल्यावर आम्हा मुलांना पुणे दौराबाबत सविस्तर हकीगत सांगत. CWPRS  ला जाऊन निराकडे गेलो होतो. सौ निराने उत्तम स्वयंपाक केला होता. सर्वच पदार्थ उत्तम रुचकर झाले होते. सौ निरा स्वयंपाक पाणी छान करते.. असे दादा म्हणायचे. लहानपणी कळायला लागल्यावर झालेली हीच सौ नीरा मावशीची प्रथम ओळख... आपली नोकरी, मुलांच्या शाळा परीक्षा, रजा वगैरे कारणास्तव मावशीचे चिकोडीस येणे जाणे क्वचित असे. माझी सुट्टी बेळगावला जायची त्यामुळे मी पुण्यात सुट्टीत कधीच गेलो नाही, अर्थात जाणे आणि नसले तरी सर्व मावशी आम्हास पत्रातून (पोस्टकार्ड नाहीतर इनलँड लेटर) मधून महिन्यातून एकदा भेटत असे.  ऑफिस व घर काम यातून सवड काढून मावशी मुलींच्या शिक्षणाची प्रगती, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, ऑफिस काम वगैरेबाबत सविस्तर हकीगत कळून आम्हा सर्व भावंडांची सविस्तर विचारपूस पत्रातून करत असे. अक्षरहीछान होते, इनलँड पत्र भरभरून ती लिहीत असे. अभ्यासाबाबत आम्हास पत्रातून मार्गदर्शन करीत असे. स्पर्धा परीक्षा...

प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला

                                                प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला  प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यान याबाबत आपण सर्वाना माहीतच असेल. येथे वेगळे काही सांगण्यास नको. मीपण वर्तमानपत्रातून त्यांच्याबद्दल खूप वाचले होत, पण प्रत्यक्षात मी त्यांचे व्याख्यान ऐकले नव्हते. आमच्या ऑफिसमधील एका सहकारीबाईनी त्यांच्या व्याख्यानाच्या ख्यातीबद्दल मला सांगितले. एकदा त्यांचे "स्वामी विवेकानंद" यांच्यावर व्याख्यान होते पण काही कारणास्तव तिथे हजेरी लावणे जमले नाही. असो एक संधी गमावली. गणपतीचे दिवस आले. गणेश उत्सव पुण्यनगरीत नेहमीच जोरदार साजरा केला जातो. पुणे फेस्टिवल शताब्दी सोहळा जोमात साजरा झाला,  श्री श्रीमंत दगडूशेट मंडळावतीने भरघोष कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात दररोज प्रा, शिवाजीराव भोसले याचे थोर व्यक्तीच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते.  या व्याख्यानमालेबाबत माहिती देऊन ही ३१ ऑगस्ट आहे. कार्यक्रमाचे स्थळ सारसबाग जवळ होते....

ती अप्पाजी - भीमरथी कार्यक्रम

                                                             ती अप्पाजी - भीमरथी कार्यक्रम  आज ती. अप्पाजींच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भीमरथी कार्यक्रम आयोजित केला आहे. अप्पाजींना त्यांचे नातलग "बाळ" असे संबोधतात. उदाहरणार्थ बाळ मामा बाळ काका वगैरे. आमच्या बाळला बाळ झाले तरी आणि त्यांच्या बाळाला बाळ झाले तरी अजून आमचा बाळ - बाळच आहे असे गमतीने त्यांच्या भगिनी सौ बेबीताई  म्हणतात. या कार्यक्रमास त्यांच्या ज्येष्ठ भगिनी सौ सुमनताई हजर आहेत, योगायोगाने मुंबईहून सौ बेबीताई आणि  श्री उदयराव सह कार्यक्रमास मुद्दाम कार्यक्रमास हजर आहेत. आमचा बाळ सत्तर वर्षाचा झाला असे त्या कदाचित मनातल्या मनात म्हणत असतील. शाब्दिक कोट्या करण्यात बाळ व बेबी यांची नेहमी स्पर्धा असे. दोघेही एकत्र जमल्यावर शाब्दिक कोट्या करून इतरांची करमणूक करत. अप्पांजींचा नियमितपणा हा गुण मला अधिक भावला.  ते नेहमी व्यायाम, चालणे वगैरे न चुकता क...

पाटील आणि कणवीकर कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व

                                            पाटील आणि कणवीकर  कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व  श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते बासरीतून सारेगम सप्त स्वर उमटतात.  एका बासरीतून समाधान, प्रसन्नता, सहनशीलता, स्वयंपाककला, नम्रता, साधेपणा आणि आदरातिथ्य..  वगैरे असे सात स्वर प्रगट होतात आणि ती बासरी म्हणजे श्रीकृष्णामाईतील मंजुमामी माझ्या लग्नानंतर मे महिना आल्यावर झुक झुक गाडी मामाच्या गावाला जाऊया मामी मोठी सुगरण वगैरे गाण्याप्रमाणे श्रीकृष्णामाई येथे सुट्टी कशी घालवली याबाबत सांगते.  मामीचे आदरातिथ्य आणि स्वयंपाकपाणी व मनापासून सर्वांना खाऊ घालणे याबाबत खरंच कौतुक करावे तेवढे कमीच ..साखरेचे खाणार त्याला देव देणार असे म्हणतात.माझातर साखरपुडा  धारवाड येथेच 1995 साली झाला त्यानंतर मला पण मामीच्या हातचे स्वयंपाक व इतर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आमचे कुलदैवत श्री बनशंकरी बदामी जेव्हा मी बदामी जातो तेव्हा जवळच अन्नपूर्णा देवी राहते तिचे दर्शन व प्रस...

"फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला

                                                  "फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला  आमच्या विभागाचे प्रमुख श्री देवधरसाहेब हे खूपच विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबीपणा , दणदणीत आवाज, परोपकारवृत्ती वगैरे गुण वाखाणण्यासारखे आहेत.  सेकशनमध्ये काम करण्याऱ्या सहकाऱ्यांवर ते नेहमीच चेष्टामस्करी करत.  कधीकधी ते मला प्रेमाने "माय डिअर सीएम" असे बोलावत तर कधी माझे चुकले तर ते "सीएम इकडे येरे - हे काय लिहितोस रे ? येन आप्पा ! असे रागावून हाका मारतील तेणेकरून आजूबाजूच्या विभागातील सहकारी माझ्याकडे बघत.  साहेबांच्यामुळे सेकशनमधील वातावरण नेहमीच खेळीमेळीचं असे. साहेब जर गैरहजर असले तर आम्हालाच काय पण आसपासच्या सेकशनमधील सहकाऱ्यांना करमत नसायचे यात शंका नाही. आमच्या विभागात काम करणारे श्री माधव आफळे हे आमच्या साहेबांचे लाडके सहकारी. आफळेंच्यापुढे मी "बुवा " लावत नाही कारण लगेच साहेब म्हणतील "बुवा तिथे बाया"  पण माधवराव उत्तम प्रवचन की...

"शताब्दी" प्रवास

                                                                         "शताब्दी" प्रवास  मी आपणा सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन कोयना एक्सप्रेस गाडीने मुबईस घरी रात्री १० वाजता सुखरूप पोचलो. २५,०५,१९९५ रोजी सकाळी घाटकोपर-दादर मार्गे लोकलने मुंबई सेन्ट्रलवर सकाळी ५.३० वाजता वेस्टर्न लाईनवर आलो. दारात गुजरात मेल स्वागतास उभी पण तिच्यातून माझा प्रवास नसल्यामुळे ती नाराज झाली. शेवटी ५.४५ वाजता तिला आम्ही टाटा केला. दरम्यान ५.३० वाजता आमची शताब्दी सेवेस हजर.  सकाळी स्थानकावरील कुलीने माझे सामान माझा नेमका डबा येईल तेथेच व्यवस्थित आणून पोचवले. मी डब्यात शिरून सीट शोधू लागलो. सारखं खिडकी मिळेल की नाही..? ही रुखरुख  आणि योगायोग खिडकीनजीकची जागा मिळाली.  मला आनंद झाला. कारण प्रवास प्रथम आणि सारा नवीन भाग.. बरोबर ६.२५ वाजता शताब्दीने वेग घेण्यास सुरुवात केली.  शताब्दी संपूर्ण AC आहे. कोचमध्ये...

निरोपसमारंभ -8 - उत्कृष्ट अष्टपैलू - मनीष गोहाड..

                                                              उत्कृष्ट अष्टपैलू -  मनीष गोहाड.. क्रिकेट खेळात अष्टपैलू खेळाडूचे स्थान महत्त्वाचे आणि मोलाचे असते संघास धावांची अपेक्षा असते तेव्हा तो भरपूर फटकेबाजी करून धावा काढतो ज्यावेळी विकेट हवे असतात त्यावेळी गोलंदाजी करून विकेट्स काढतो. क्षेत्ररक्षणाबाबत तो कोणत्याही ठिकाणी क्षेत्ररक्षण करून झेल पकडून अथवा धावा अडवून संघास विजय मिळवून देत. आपल्या कामगिरीमुळे संघाच्या आणि प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान पटकावून मनात घर करून राहतो. शिरूर संघातील उत्कृष्ट अष्टपैलू म्हणजेच मनीष गोहाड.. दर सहामाही शाखेचा ताळेबंद,  इन्कम टॅक्स, अग्रीम स्टेटमेंट, रिटर्न्स, बँक ऑफिस, सिबिल, कॉम्प्युटर आणि इतर कामाच्या वेगवेगळ्या मैदानावर मनीषने चौफेर अष्टपैलू खेळ करून संघास विजय मिळवून दिला आहे. सांघिक कामगिरीमध्ये मनीषचा सिंहाचा वाटा आहे यात  शंका नाहीच. संघातील इतर खेळाडू तंबूत परतल्या अ...