श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती - प.पू. श्री सद्गुरुदास महाराज
श्री गुरुपुर्णिमा सत्संग या कार्यक्रमामध्ये दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष धर्मभास्कर प.पू. श्री सद्गुरुदास महाराज (श्री विजयराव देशमुख) यांचे श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती याविषयावर प्रवचन आबासाहेब गरवारे सभागृह येथे शनिवार दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. सुरुवातीस श्री रघुनंद पणशीकर यांनी गुरुभक्तीवर गाणे गायले. गुरुचरित्र कसे लिहिले हे सांगितले. प्रारंभी देवांनी अनुसूया परीक्षाबाबत कथा सांगितली. अनुसूयाचे पतिव्रता अतिशय कडक होते. आपल्या पती/गुरुचे स्मरण करून परीक्षा पार पाडली. गुरुचरित्र हा मंत्रग्रंथ आहे. गुरुभक्ती मध्ये नारदभक्ती यात ८४ सूत्र सांगितली आहेत. श्री गुरुचरित्रात अध्याय - २,९, १४,२०, ४१ आणि ४८ यातील गुरुभक्ती बाबत कथा सांगितल्या. सुख-दुःख देव अगर गुरु कोणीही देत नाही. आपल्या कर्माचे सुख/दुःख भोग आपल्यालाच भोगावे लागतात. मात्र आपले गुरु आपले भोग कमी करतात. गुरुचरित्र हा ट्रान्स मध्ये घेऊन जाणारा ग्रंथ आहे. स्तुती पेक्षा स्तवन महत्वाचे- स्तवनामध्ये भाव असतो. स्तवन करावे, गुरुभजनी रमावे, नम्र राहावे... याने आर्त वाढतो.. व...