Posts

"जेष्ठांचे पडणे " - Fall ... prevention and fitness in geriatric patients

Image
  २८ ऑक्टोबर २०२३ - कर्नल्स क्यूब यांनी "जेष्ठांचे पडणे " Fall ... prevention and fitness in  geriatric patients या विषयावर डॉ. चेतन प्रधान यांचे भाषण आयोजित केले होते. वृद्धांचे (६५ वय ) पडणे, त्याची कारणे, त्यावर उपाय, उपचार, हाडे ठिसुळ होणे - Ostoporosis .. याबाबत सविस्तर माहिती सांगून आकडेवारी सादर केली. साठी नंतर इतर शारीरिक टेस्ट मध्ये DEXA - हाडाची टेस्ट करून घ्यावी असा सल्ला दिला. भारतात केरळ, महाराष्ट्र, वेस्ट बंगाल या राज्यात फ्रॅक्चर प्रमाण अधिक .. ८०% लोक घरात पडतात आणि ९०% बाथरूम  मध्ये पडतात.   पडल्यानंतर आणि ऑपेरेशन झाल्यावर आजारी रोग्यास हांथरूणातून बाहेर काढून शक्य तितक्या लवकर चालायला लावणे हा मंत्र सांगितला.  व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, फिजोयेथेरपी, घरी बाथरूममध्ये घ्यावयाची काळजी, याबाबत अधिक माहिती सांगून वृद्धांच्या समस्या, याबाबत आपले अनुभव सांगितले.संचेती हॉस्पिटल मध्ये डॉ.चेतन प्रधान हे ऑर्थोपेडिक सर्जन - दिवसाला जवळजवळ ३-५ क्रिटिकल ऑपरेशन्स करतात.  आपल्या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, औषधे, विशेष काळजी विभाग, याबाबत सविस्तर माहिती...

"प्यासा " सिनेमा

  १७ ऑक्टोबर २३ - DD National चॅनेलवर रात्री ९.३० वाजता स्पेशल "वहिदा" सिनेमा मध्ये "प्यासा " सिनेमा दूरदर्शन वर पाहिला. हा सिनेमा गुरुदत्त यांनी १९५७ साली दिग्दर्शित केला.  हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा माझ्या जन्मापूर्वीचा.. मी प्रथमच पाहिला.  फक्त मस्तील चॅनेलवर काही गाणी ऐकली होती.  यातील वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांचा अभिनय, गाणी... अतिशय उत्तम...सिनेमा ९.३० ते ११.५० पर्यंत चालू होता मध्ये एकपण जाहिरात नव्हती.  एरव्ही दहाच्या आधी टीव्ही पाहताना मला नेहमी पेंग येते पण हा सिनेमा पाहताना - The End .. येथपर्यंत झोप कोठे पळाली .. ? असे गमतीने सौ.म्हणाली... बहुतेक ही "वहिदा"ची किमया...वहिदाच्या आणि गुरुदत्त यांच्या अभिनयास मानाचा मुजरा..  Hats off to Gurudatta  for excellent direction .. class movie 

"Health through Ayurveda " - डॉ योगिनी पाटील

Image
  ऑफिसमध्ये डॉ योगिनी पाटील यांचे "Health through Ayurveda " या विषयावर भाषण कार्यक्रम आयोजित केला होता. आयुर्वेद बाबत माहिती दिली. आयृर्वेदाची उत्पत्ती, कोणत्या वेदात, अष्टांग आयुर्वेद ,आरोग्याची व्याख्या.. याबाबत प्राथमिक माहिती दिली. चवनप्राश याबाबत गोष्ट, चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याची आयुर्वेदावर ऑडिओ विडिओ, दाखवला.  आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यत्मिक, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोष, दोष, धातू, मल,धर्म,अर्थ काम, मोक्ष यामध्ये आरोग्याचे महत्व, धर्माचा आणि ब्रह्मचर्य यांचा आयृवेदातील खरा अर्थ या विषयावर प्रकाश टाकला गेला.   आपली दिनचर्या, आहार, विहार आचार विचार कसे हवेत याबाबत आयुर्वेद काय सांगते याबाबत माहिती दिली. आहार, निद्रा, विचार, सौमनस्य  - माणूस आणि प्राणी यातील फरक... समत्व यांचे महत्व.. कोणत्या १३ बाबी (तहान भूक,उचकी, शिंक....) रोखुन ठेवायच्या नाही, राग, लोभ, मद, मत्सर, काम, क्रोध या विकारावर संयम ठेवून सदविचार आणि सदवर्तन हवे म्हणजे स्वास्थ नेहमी चांगले राहते.  आयुर्वेदातील श्लोक आणि त्यांचा अर्थ सांगितला.  आयुर्वेदासारखा म...

"गुलमोहर" - चित्रपट -2

  नुकताच राहुल चित्तेला यांनी दिग्दर्शित केलेला "गुलमोहर" हा सिनेमा पाहिला. एक उच्चभ्रू कुटुंबातील कथानक.. एकत्र कुटुंबात आजी, आई वडील, मुलंमुली, नातवंडे,नातसून.. असे मोठे कुटुंब एका फ्लॅटमध्ये  राहत असतात .  एकत्र राहत असलेतरी बाप-लेक, आई-मुलगी नात्यात दुरावा असतो.  सगळे एकत्र एका फ्लॅट मध्ये राहत असलेतरी या फ्लॅटमध्ये प्रत्येकाचा एक एक फ्लॅट आहे,  असे चिडून पिता म्हणतो.. ही एक कौटुंबिक कहाणी आहे.  सुख-दुःखात प्रत्येकानी एकमेकांना समजून आनंदाने राहावे आणि घरगुती समारंभ साजरे करावे.. माणसाकडे किती संपत्ती, पैसा, फ्लॅट यापेक्षा समजंस्याने, कुटुंबात  संवाद, प्रेम असणे हे महत्वाचे हा संदेश देऊन या चित्रपट संपतो.  चित्रपटात - बाप्पाची प्रमुख भूमिका मनोज बाजपेयी तर आजीची भूमिका एव्हरग्रीन शर्मिला टागोर.  या दोघांनी उत्तम भूमिका केली आहे.. बाकी दिग्दर्शन उत्तम झाले आहे. चित्रपट जरूर पाहावा. माझ्या चिरंजीवांनी या चित्रपटाची शिफारस करून आम्हाला घरीच चित्रपट दाखवला. चित्रपट आवडला.. म्हणून आपणास शेयर करतो..

जागतिक टपाल दिन -

  आज ९ ऑक्टोबर २०२३ - जागतिक टपाल दिन - टपाल म्हटल्यावर मला बालपणीचा काळ आठवला.  आमच्या लहानपणी टपाल हेच प्रामुख्याने संपर्क संवाद याचे साधन होते.  आपल्या आत्या, मावशी, काका याना आम्ही पत्राने खुशाली कळवत असे.  त्यांच्याकडूनही आमच्या पत्रास उत्तर येत असे.  शाळा सुटीदिवशी आम्ही दारात  पोस्टमनची आतुरतेने वाट पाहत असू. शेजारी पत्र आणि आमच्या घरी पत्र नाही म्हटल्यावर नाराज होत असू. शाळा सुटल्यावर मी एक वकील यांच्याकडे पत्र लेखनासाठी जात असे.  त्यांना डोळ्याला दिसत नव्हते.  त्यांच्या मुलामुलींना खुशालीचे पत्रे, अशिलांना दोन ओळीची पत्रे (पुढील तारीख आणि फी घेऊन या मजकुराची) लिखाण असे. कधीकधी तोचतोच मजकूर या मुळे कंटाळा येत असे. आमच्या घरी एक वयस्कर कामवाली होत्या त्यांचा मुलगा मुंबईस मिलमध्ये कामाला होता.  त्यांचापण एक डोळा कायमचा रजेवर गेला होता.  मुलास खुशाली आणि पैसे मागण्यांबाबत पत्र लिखाण काम असे. मनिऑर्डर मिळाल्यावर पोचपत्र असे. पुढे नोकरी निमित्य परगावी परत पत्र.. बँकेत नोकरी पण - काही काळ "स्टेनो" म्हणून परत पत्राचार.. लग्न ठरल्यावर प्...

श्री नागेश्वर मंदिर आणि श्री त्रिशुंडी गणपती मंदिरास भेट

Image
  सोमवारपेठ पुणे येथील भागातील श्री नागेश्वर मंदिर आणि श्री त्रिशुंडी गणपती मंदिरास भेट दिली.  श्री नागेश्वर मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे अति प्राचीन पेशवेकालीन मंदिर .. येथे स्वयंभू शिवलिंग आहे. हे मंदिर एका वाडा परिसरात शांत वातावरणात वसले आहे.  येथून जवळच श्री त्रिशुंडी गणपती मंदिर आहे. हे 1754 साली बांधलेले पेशवेकालीन गणपती मंदिर... गणपतीस तीन सोंड व सहा हात असलेल्या या गणेशाच्या  डाव्या मांडीवर देवी वसलेली असून गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे. यामुळे या गणेशास "त्रिशुंड मयूर गणेश " म्हणून ओळखले जाते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर देवनागरी, संस्कृत आणि पारशी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे.  मंदिराच्या खाली त्याच आकाराचे तळघर आहे. तळघरात दलपतगीर महारांची समाधी आहे. तळघरात गुढघाभर पाणी वर्षभर असते. हे बंद असते.  या दोन्ही विशेष अर्वाचीन मंदिरास जरूर भेट द्या.. गणपती बाप्पा मोरया कसबा  गणपती, दगडूशेट गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिरास भेट दिल्यानंतर पुना गेस्ट हाऊस येथे महाराष्ट्रीयन स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.

सिर्फ एक बंदा काफी है - चित्रपट

   नुकताच  सिर्फ एक बंदा काफी है - हा चित्रपट पाहिला   हा सिनेमा अपूर्व सिंह कार्की यांनी दिगदर्शित केला आहे  एक बालिका एका धर्मगुरू एक बालिकेवर अत्याचार करून बलात्कार करतो  त्या धर्मगुरू वर बालिका कोर्टात केस लावते  ती केस ५ वर्षे चालते आणि शेवटी धर्मगुरूला शिक्षा होते  या सिनेमाची कहाणी आसाराम बापू यांच्या जीवनावर आधारित आहे  मनोज बाजपेयी हा नायक अत्यंत निर्भयतेने आणि साहसाने ही  केस लढवतो आणि जिंकतो  या केस शेवटी मनोज बाजपेयी कोर्टासमोर रामायणातील एक रावणाच्या मोक्ष बाबत एक कथा सादर करतात ही मनास  भावून जाते   मनोज बाजपेयी यांनी उत्तम भूमिका पार पाडली आहे  सिनेमा जरूर पहावा