आठवणीतील शांताबाई - कार्यक्रम
९ ऑक्टोबर २०२२ - "आठवणीतील शांताबाई" - शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या मराठी गाण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केला होता. जय शारदे .., ही वाट दूर जाते,, तोच चंद्रमा नभात.. काटा रुते .. दाटुनी कंठ येतो.. हा माझा मार्ग ऐकला, निळ्या आकाशी.. शूर आम्ही.. कर्नाटकी कशिदा. हात लावू नका माझ्या साडीला.. ही गाजलेली गाणी चैत्राली अभ्यंकर, वाळुंजकर, संजीव मेहेंदळे या गायकांनी गायली. सर्वच गीते अत्यंत श्रवणीय होती. कार्यक्रमामध्ये शांताबाई शेळके यांच्या जन्म शताब्दी सोहळा निमित्य शांताबाई शेळके प्रथम पुरस्कार श्री गुरु ठाकूर याना डॉ. अरुण ढेरे यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी श्री गुरु ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रवीण दवणे यांनी उत्तम भाषण केले. भाषणात शांताबाई शेळके यांच्या काही आठवणी वेळातवेळ काढून कथन करीत पुणेकरांना चिमटे काढले. प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात पुणेकरांची बाजू मांडली. डॉ.अरुण ढेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. मेधा कुलकर्णी यांनीपण या कार्यक्रम आणि पुरस्कार बाबत आपले विचार मांडले. सर्व ...