आठवणीतील शांताबाई - कार्यक्रम
९ ऑक्टोबर २०२२ - "आठवणीतील शांताबाई" - शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या मराठी गाण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केला होता. जय शारदे .., ही वाट दूर जाते,, तोच चंद्रमा नभात.. काटा रुते .. दाटुनी कंठ येतो.. हा माझा मार्ग ऐकला, निळ्या आकाशी.. शूर आम्ही.. कर्नाटकी कशिदा. हात लावू नका माझ्या साडीला.. ही गाजलेली गाणी चैत्राली अभ्यंकर, वाळुंजकर, संजीव मेहेंदळे या गायकांनी गायली. सर्वच गीते अत्यंत श्रवणीय होती.
कार्यक्रमामध्ये शांताबाई शेळके यांच्या जन्म शताब्दी सोहळा निमित्य शांताबाई शेळके प्रथम पुरस्कार श्री गुरु ठाकूर याना डॉ. अरुण ढेरे यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी श्री गुरु ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रवीण दवणे यांनी उत्तम भाषण केले. भाषणात शांताबाई शेळके यांच्या काही आठवणी वेळातवेळ काढून कथन करीत पुणेकरांना चिमटे काढले. प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात पुणेकरांची बाजू मांडली. डॉ.अरुण ढेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. मेधा कुलकर्णी यांनीपण या कार्यक्रम आणि पुरस्कार बाबत आपले विचार मांडले. सर्व व्यक्त्यांनी पुणेकरांच्या रसिकपणाबाबत कौतुक विशेष उल्लेख केला. कार्यक्रम रविवारी सकाळी ८.३० वाजता होता आणि नाट्यगृह रसिकांनी तुडुंब भरले होते.कार्यक्रमात बेलवलकर हौसिंगचे श्री समीर बेलवलकर यांनी "ऐशी अक्षरे" या मासिकाच्या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली. वर्षातून तीनदा हे मासिक छापले जाते आणि विनामूल्य वाचकांना दिले जाते. या उपक्रमास १९ वर्ष झाली.
कार्यक्रम अत्यंत श्रवणीय आणि सुंदर झाला. रसिकांनी गाण्यास आणि भाषणावेळी भरभरून दाद दिली. मला वाटते हे सर्व शांताबाई शेळके यांच्या प्रेमापोटी. श्री गुरु ठाकूर यांच्याबाबत मी ऐकून होतो. प्रथमच त्यांना पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला. कार्यक्रमामुळे मनास आनंद झाला.तो आनंद कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त आपणास वाटत आहे...🙏




Comments
Post a Comment