"कुटुंब" आणि "चहा" दिन साजरा

 




आज प्रवीणच्या घरी(बंगल्यावर) कोथरुडवासीय कुटुंबाचे स्नेह-भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. बऱ्याच दिवसानी आम्ही एकत्र भेटलो, गप्पा झाल्या. भोजनात - भाकरी, पोळी , भरली वांगी, पिठले, चवळी उसळ, कोशिंबीर, पापड, मिरची सांडगे, लिंबाचे/आंब्याचे लोणचे,  मिरची ठेचा, शिरा, मसाले भात, दही भात, दही ताक, आंबील,.. ताटभरुन पदार्थ होते.  भोजनानंतर Ice-क्रीम आणि  मसाला पान जोडीला होतेच. भोजनातील सर्व अन्नपदार्थ रुचकर आणि चविष्ट होते.  प्रेमाने आणि आग्रहाने वाढल्यामुळे सर्वानी भरपेट पोटपूजा केली. जेवण झाल्यावर सौ. मनीषा वाहिनी, सौ. वर्षा, सपना आणि पियुष यांनी गाणी म्हटली, खूप मजा आणि आनंद झाला. आम्ही जवळजवळ १८ जण जमलो होतो. प्रत्येक कुटुंबांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. संध्याकाळी चहा घेऊन पाच वाजता  परत भेटू असे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.  जाताना जेवताना ताटात जागा नसल्यामुळे सर्वाना पुरण पोळी पार्सल दिले गेले.  या कार्यक्रमाचे आयोजन बाबत आपल्या उत्साही (वयाची सत्तरी पार केलेल्या) ती. सौ. सुषमा काकूंनी पुढाकार घेतला आणि सौ मनीषावहिनी यांचे नियोजन.  आणि महत्वाचे - सर्वानी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून आनंदाने सहभाग घेतला. सर्वांचे आभार आणि धन्यवाद.. खऱ्या अर्थाने आज आमच्या "हमारा खानदानाचा  "कुटुंब" आणि   "चहा" दिन  साजरा झाला.  असेच  एकमेकात प्रेम, जिव्हाळा सदैव्य राहो आणि वृद्धिंगत हो .. हीच प्रार्थना श्री शाकंभरी देवीस...


22.05.2022

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा