तबला - संतूर -वादन कार्यक्रम

 


२५ जून - Rithwik Foundation for performing arts यांच्यावतीने पंडित सतीश व्यास - संतूर वादन आणि ओजस अधिया - तबला वादन कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम पंडित व्यास यांनी आपले गुरु पंडित शिवकुमार शर्मा  यांना आदरांजली वाहिली.  वादन कार्यक्रमापूर्वी पंडित सतीश व्यास यांच्याबरोबर संवाद झाला.  वयाच्या १३ वर्षी पंडित शिवकुमार यांची भेट घडून संतूर वादन शिकवणी सुरु झाली.  गुरूंनी काश्मीर वरून मागवलेली संतूर मुंबईस यायला ६ महिने लागले. गुरूंनी दिलेली संतूर आजतागायत वाजवत आहेत. ४७ वर्षे गुरूंचा सहवास लाभला. पंडित शिवकुमार शर्मा हे अत्यंत "अध्यात्मिक व्यक्तिमत्व " -  देशात अगर परदेशी प्रवास अगर कोणतीही परिस्थिती असली तरी शिवकुमार खूप शांत असायचे.  आपल्याला हे शांत राहणे खूप कठीण.  श्री चिंतामण व्यास यासारखे पिता आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासारखे गुरु - या दोन महान आध्यत्मिक व्यक्ती जीवनात लाभल्या - ही पूर्वजन्माची पुण्याई अशी कबुली पंडित सतीश व्यास यांनी दिली. 

श्री ओजस अधिया हे तरुण तबलजी यांनी त्यांना साथ दिली. दोघांची जुगलबंदी आणि वादन उत्तम आणि श्रवणीय होते. संतूर वादनात "मियत मल्हार" आणि "किरवानी" राग सादर केला. बाकी संगीतातील राग याबाबत मला काहीच कळत नाही.  माझी पत्नी सौ. वर्षा हीला रागाबाबत माहिती आणि ज्ञान आहे. मला मात्र २५ वर्षांपासून  सौ. चे राग याबाबत सर्व कळते.  कार्यक्रम ७.३० वाजता सुरु झाला आणि ९.३० वाजता संपला. सर्व रसिक श्रोते अगदी तल्लीन झाले होते. कार्यक्रम संपल्यावर जवळजवळ अर्धा तास मी तरंगत होतो. दोघांचा प्रथम प्रत्यक्ष कार्यक्रम पहिला.  अत्यंत हृदयस्पर्शी आणि श्रवणीय होता.

कार्यक्रम स्थळ शोधण्यात थोडा  वेळ लागला.  वेदविहार भागात नवीन रस्ता बांधकाम चालू होते.  आता परत घरी परत जावे असे विचार करीत होतो. वाटेत वेदभवन गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे तोच खरा मार्ग दाखवेल...देवळात चौकशी कक्षात एक महिला होत्या त्यांना विचारले असता त्यांनी बरोबर रस्ता सांगितला. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन परत मी शोध मोहीम कडे वाटचाल... आणि शेवटी सापडले.  खरच गणपती बाप्पानी मार्ग दाखवला.. नाहीतर मी एक उत्तम कार्यक्रमास मुकलो असतो. .. ही सारी गणपती बाप्पाची किमया आणि कृपा....ओम गणपतेय: नमः 





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा